सेवानिवृत्त शिक्षकावर मित्राकडून ऍसिड हल्ला 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जानेवारी 2018

पुणे - सेवानिवृत्त शिक्षकावर त्यांच्या मित्राने ऍसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी घडली. यात ते भाजले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. 

भारत खंडू साबळे (वय 60, रा. संचेती अपार्टमेंट, सिंहगड रस्ता) असे जखमी झालेल्या सेवानिवृत्त शिक्षकाचे नाव आहे. तर, मनोज चव्हाण (वय 45, रा. धनकवडी) असे संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साबळे आणि चव्हाण हे जुने मित्र आहेत. साबळे हे रेंजहिल्स येथील शाळेतून शिक्षकपदावरून सेवानिवृत्त झाले आहेत; तर चव्हाण हा महापालिकेच्या टिळक रस्त्यावरील क्षेत्रीय कार्यालयात लिपिकपदावर नोकरीस आहे. साबळे हे सोमवारी दुपारी सारसबागेसमोरील पदपथावरून पायी जात होते. त्या वेळी चव्हाण याने त्यांच्या चेहऱ्यावर बाटलीतून ऍसिड फेकले. त्यात ते 12 टक्के भाजले आहेत. या हल्ल्यात जखमी झालेल्या साबळे यांनी मुलाला फोन करून चव्हाण याने ऍसिड फेकल्याची माहिती दिली. त्यांना नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले. सायंकाळी पाचच्या सुमारास पोलिसांना कळविण्यात आले. स्वारगेट पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. 

Web Title: pune news retired teacher crime