तालवाद्य अन्‌ नृत्याविष्काराने उद्या रंगणार ‘तालयात्रा’

तालवाद्य अन्‌ नृत्याविष्काराने उद्या रंगणार ‘तालयात्रा’

पुणे -  तालयोगी पंडित सुरेश तळवलकरांच्या तालविषयक चिंतनातून निर्माण झालेल्या ‘तालयात्रा’ या तबला, पखवाज, पाश्‍चात्त्य तालवाद्य, सतार, बासरी, कथ्थक नृत्य आणि उत्तर भारतीय संगीताचे फ्युजन सादर करणाऱ्या कार्यक्रमाने पुणेकरांची दिवाळीची सकाळ सजणार आहे.

कर्वेनगरमधील महालक्ष्मी लॉन्स येथे नरक चतुर्दशीच्या सकाळी, बुधवारी (ता.१८) ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे ‘दिवाळी पहाट’चे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी पी. एन. गाडगीळ (१८३२) हे मुख्य प्रायोजक तर लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड आणि देवधर्स ॲकॅडमी ऑफ एक्‍सलन्स हे सहप्रायोजक आहेत.

‘तालयात्रा’ ही आगळीवेगळी कलाकृती १९९४ मध्ये निर्माण केली. गायन, वादन, नृत्य हे तिन्ही माध्यम वेगवेगळे वाटत असले तरी संगीत हे एकच आहे; पण या तिन्ही माध्यमांचा सुंदर मिलाफ म्हणजे ‘तालयात्रा’. या मैफलीत वेगवेगळी वाद्ये असली तरी हे ‘फ्युजन’ नाही. वेगवेगळे राग-बंदिशी यात आहेतच. तरीही ही लय-ताल केंद्रित मैफल आहे. पंचवीसहून अधिक कलावंतांचा हा एकत्रित कलाविष्कार आहे. अशी एक उच्चतम कलाकृती दिवाळीत अनुभवण्याची संधी श्रोत्यांना मिळणार आहे.
- पं. सुरेश तळवलकर, तालयोगी 

पूर्वी दिवाळी पहाट ही संकल्पना नव्हती; पण आता दिवाळी पहाट हा आपल्या मराठमोळ्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. यातून नव्या पिढीला आपल्या संस्कृतीची माहिती मिळण्यासह दिवाळी एका वेगळ्या पद्धतीने साजरी करण्याची रीत निर्माण झाली आहे. ही संकल्पना चांगली असून, दिवाळी पहाटचा आनंद घेणारे रसिकही दिवसेंदिवस वाढत आहेत. म्हणून ‘सकाळ’ने आयोजित केलेला ‘तालयात्रा’ हा दिवाळी पहाट कार्यक्रम नक्कीच पुणेकर रसिकांच्या पसंतीस उतरेल.
- अभय गाडगीळ, व्यवस्थापकीय संचालक, पु. ना. गाडगीळ (१८३२)

दिवाळी पहाटमधून आपली दिवाळी काहीशी खास बनते. सप्तसुरांच्या मैफलीत दिवाळीची पहाट काहीशी वेगळी व्हावी आणि सुरांच्या जोडीने तिला एक वेगळे निमित्त मिळावे म्हणून दिवाळी पहाट कार्यक्रम होत आहेत. त्या कार्यक्रमांना हजेरी लावणारे रसिकही वाढले आहेत. त्यामुळे ‘सकाळ’च्या दिवाळी पहाट कार्यक्रमालाही रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळेल यात शंका नाही. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुरांची आणि संगीताची सुरेल मेजवानी रसिकांना मिळणार आहे. 
- संदीप देवधर, संचालक, देवधर्स ॲकॅडमी ऑफ एक्‍सलन्स

दिवाळी पहाट रसिकांना संगीताशी जोडून ठेवते. त्यातून एक वेगळाच आनंद व स्फूर्ती मिळते. हा आपल्या परंपरेचा एक भाग असून, दिवाळीचे निमित्त काहीसे खास बनविण्यासाठी पुणेकर रसिक आवर्जून दिवाळी पहाट कार्यक्रमांना हजेरी लावतात. असाच ‘तालयात्रा’ हा कार्यक्रम असून, या माध्यमातून रसिकांना संगीताची आणि सुरांची निराळी जुगलबंदी ऐकायला मिळणार आहे. 
- सुशील जाधव, झोनल मॅनेजर, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com