रिक्षाचालकांनी आरोग्याची काळजी घ्यावी - शिरोळे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

पुणे - ‘‘दिल्लीप्रमाणे पुणे शहरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. या प्रदूषणाचा फटका रिक्षाचालकांना बसत असून, सीएनजीच्या माध्यमातून ‘एमएनजीएल’सारख्या सरकारी कंपन्या प्रदूषण कमी करण्यासाठी हातभार लावत आहेत. परंतु प्रदूषित वातावरणात रिक्षाचालकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्‍यक आहे. त्याकरिता संतुलित आहार व योगा गरजेचा आहे,’’ असे मत खासदार अनिल शिरोळे यांनी व्यक्त केले. 

महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड आणि हिंद शक्ती सोशल फाउंडेशनतर्फे राबविण्यात येत असलेल्या स्वस्थसारथी शिबिराचे उद्‌घाटन शिरोळे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. डॉ. बाबा आढाव, नितीन पवार, एमएनजीएलचे व्यवस्थापकीय संचालक अरविंद तांबेकर, संतोष सोनटक्के, हिंद शक्ती सोशल फाउंडेशनचे सचिव सुनील पांडे, डॉ. सचिन देशपांडे, डिंपल बुचे उपस्थित होते. पवार म्हणाले, ‘‘रिक्षाचालकांना सीएनजी किटकरिता पुणे महानगरपालिकेकडून प्रत्येकी बारा हजार रुपयांचे अनुदान मिळते. अनेक रिक्षाचालक अजूनही या अनुदानाच्या प्रतीक्षेत असून, चार हजार पाचशे अर्ज प्रलंबित आहेत. प्रदूषणविरहित पुण्याकरिता सीएनजी आवश्‍यक असून, यंदाच्या महापालिकेच्या अंदाजपत्रकात सात कोटी रुपयांची तरतूद व्हावी.’’
दरम्यान शिबिरात चालकांचे आरोग्यविषयक  सर्वेक्षण होणार आहे. यामध्ये आरोग्याबाबत जनजागृती करण्यात येईल.

Web Title: pune news Rickshaw drivers should take care of their health