पुणेः रिक्षाचालकाला मारहाण करून संगम पुलावरून नदीत फेकले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

पुणे: चोरीच्या गुन्ह्यात गुंतविल्यावरून तिघा मित्रांनी रिक्षाचालकाला मारहाण करून संगम पुलावरून नदीत फेकून दिल्याची घटना बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी खडकी पोलिसांनी तिघांना अटक केली.

पुणे: चोरीच्या गुन्ह्यात गुंतविल्यावरून तिघा मित्रांनी रिक्षाचालकाला मारहाण करून संगम पुलावरून नदीत फेकून दिल्याची घटना बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी खडकी पोलिसांनी तिघांना अटक केली.

नीलेश श्रीनिवास केंची (वय 32, रा. इंदिरानगर, बिबवेवाडी) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी आई रत्नमाला श्रीनिवास केंची (वय 55, रा. इंदिरानगर, बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली. त्यावरून खडकी पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय भारत चवतमहाल (वय 30, रा. अपर ओटा, इंदिरानगर), नितीन सुरेश जोगदंड (वय 30) आणि प्रकाश बाळासाहेब ओव्हाळ (वय 22, दोघे रा. दांडेकर पूल) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

आरोपी आणि नीलेश हे चौघेही मित्र असून, त्यांच्यावर एका रिक्षाचालकाला लुबाडल्याचा जुना गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी ते चौघेही बुधवारी न्यायालयात हजर राहिले. त्यानंतर त्यांनी येरवड्यात दारू पिली. तेथून चौघे जण रिक्षातून पाटील इस्टेटजवळ आले. चोरीच्या गुन्ह्यात गोवल्याच्या कारणावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. तिघांनी नीलेशला मारहाण केली. त्यानंतर त्याला संगम पुलाच्या कठड्यावरून मुळा-मुठा नदीत फेकून दिले. त्यात नीलेशचा मृत्यू झाला.

एका प्रत्यक्षदर्शीने ही बाब पोलिस नियंत्रण कक्षात कळविली. त्यावर खडकी पोलिस घटनास्थळी पोचले; परंतु त्यांना मृतदेह सापडला नाही. त्यामुळे पोलिसांनी रिक्षाच्या क्रमांकावरून आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पोलिस आरोपीच्या भावाच्या घरी गेले. तसेच, पोलिसांनी तांत्रिक तपास करून आरोपींच्या मुसक्‍या आवळल्या. वरिष्ठ निरीक्षक लक्ष्मण बोराटे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) ए. एस. लकडे यांच्यासह सहायक निरीक्षक राजेंद्र निकाळजे, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी भोसले, कर्मचारी प्रदीप गाडे, तुषार शिंदे, किरण घुटे आदी ही कारवाई केली.

'ई सकाळ'वरील महत्वाच्या ताज्या बातम्या
बलात्काराचा आरोप करत जमावाने केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू
नाशिकमध्ये व्हॉटसऍपचे हॅकिंग; दक्षतेचे आवाहन
सामान्यांच्या जेवणात दिसू लागले वरण
वारीद्वारे केली अपंगत्वावर मात
परभणी: पत्नीची पेटवून घेऊन तर पतीची गळफास घेऊन आत्महत्या
कल्याणमध्ये पावसामुळे रस्त्यावर खड्डे; वाहतुकीची कोंडी
अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी फरार
'बीफ' बाळगल्याच्या आरोपाखाली जमावाच्या मारहाणीत एकाचा मृत्यू
नाशिकमधील सोनसाळखीची चोरी सीसीटीव्हीत कैद (Video)
यवतमाळ जिल्ह्यात वीज पडून एकाचा मृत्यू

Web Title: pune news riksha driver murder case