सरमिसळ ठिकाणी एकच रिंगरोड 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

पुणे - एकाच ठिकाणाहून (ओव्हरलॅप) जात असल्याने गरज नसताना भूसंपादनापासून अनेक प्रश्‍न निर्माण होऊ नयेत यासाठी सेलू ते पुणे-मुंबई रस्त्यावरील उर्से टोलनाक्‍यादरम्यान एकच रिंगरोड कायम ठेवण्याची शिफारस राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समितीने केली आहे. सरमिसळ होणाऱ्या ठिकाणी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) नियोजित रिंगरोड कायम ठेवण्याची ही शिफारस आहे.  

पुणे - एकाच ठिकाणाहून (ओव्हरलॅप) जात असल्याने गरज नसताना भूसंपादनापासून अनेक प्रश्‍न निर्माण होऊ नयेत यासाठी सेलू ते पुणे-मुंबई रस्त्यावरील उर्से टोलनाक्‍यादरम्यान एकच रिंगरोड कायम ठेवण्याची शिफारस राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समितीने केली आहे. सरमिसळ होणाऱ्या ठिकाणी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) नियोजित रिंगरोड कायम ठेवण्याची ही शिफारस आहे.  

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) केलेल्या रिंगरोडमध्ये समितीने आणखी दोन ठिकाणी बदल सुचविले आहेत. ते बदल होऊन दोन्ही रिंगरोड अस्तित्वात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन्ही रिंगरोड जवळपास ४२ किलोमीटर अंतर समांतर जात होते. त्यामुळे एकाच गावात दोन रिंगरोडसाठी भूसंपादन करावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचा विरोध होता. काही शेतकऱ्यांनी तर एमएसआरडीसीच्या रिंगरोड विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती.

जिल्ह्यात दोन्ही रिंगरोड होणार
एमएसआरडीसीच्या रिंगरोड संदर्भात समितीनेच निर्णय घ्यावा, असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला होता. त्यानुसार समितीच्या दोन ते तीन बैठका झाल्या. त्यानंतर समितीने एमएसआरडीसीच्या रिंगरोडमध्ये काही बदल सुचवीत राज्य सरकारला अहवाल सादर केला. 

त्यावरून सरकारने एमएसआरडीसीच्या रिंगरोडमध्ये बदल करण्याचे आदेश नव्याने काढले आहेत. त्यामुळे दोन्ही रिंगरोडवरून निर्माण झालेला वाद मिटण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. यावरून जिल्ह्यात दोन्ही रिंगरोड होणार असल्याचे जवळपास स्पष्ट  झाले आहे.

एमएसआरडीसीच्या रिंगरोडमध्ये सुचविलेले बदल
 पुणे- सोलापूर रस्त्यावरील सेलू गावापासून वडकी गाव आणि खेडशिवापूरपर्यंत दोन्ही रिंगरोड एकमेकांना समांतर आणि एकमेकांपासून लांब असल्यामुळे त्याभागात दोन्ही रिंगरोड विकसित करावेत.
 उर्से ते सेलू या दरम्यानची पीएमआरडीएच्या रिंगरोडची आखणी कायम ठेऊन एमएसआरडीसीच्या रिंगरोडची आखणी रद्द करावी.
 उर्से ते परंदवाडी दरम्यानच्या रिंगरोडमध्ये एमएसआरडीसीने ‘इंटरचेंज’ करून पीएमआरडीएच्या रिंगरोडसाठी ॲक्‍सेस उपलब्ध करून द्यावा.
 सेलू येथे पीएमआरडीएने रिंगरोडच्या आखणीत बदल करून एमएसआरडीसीच्या रिंगरोडला जोडण्यासाठी ॲक्‍सेस उपलब्ध करून देण्यासाठी इंटरचेंज करून द्यावा.
 सेलू ते सोरतापवाडी (पुणे-सोलापूर रस्ता) आणि खेड-शिवापूर (पुणे-सातारा रस्ता) येथून येणारे दोन्ही रस्ते वडकी येथे एकमेकांना मिळतात. त्यामुळे सोरतापवाडी ते खेडशिवापूर दरम्यान एमएसआरडीसीने केलेली रस्त्याची आखणी सासवडच्या दक्षिण पूर्व बाजूने सासवडकडे पुनर्रचित करावी.

Web Title: pune news ring road