पुरंदर विमानतळापर्यंत रिंगरोड न्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

राज्य सरकारची राज्य रस्ते विकास महामंडळाला सूचना
पुणे - सोरतापवाडी ते खेडशिवापूर दरम्यानच्या रिंगरोड प्रस्तावित मार्गात बदल करून पुनर्रचना करताना पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत तो न्यावा, अशा सूचना राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) दिल्या आहेत. त्यामुळे ‘एमएसआरडीसी’कडून नव्याने या भागात आखणी करण्यात येणाऱ्या रिंगरोडमुळे सोलापूर रस्त्यावरून आणि सातारा रस्त्यावरून येणाऱ्यांना विमानतळावर पोचणे शक्‍य होणार आहे. 

‘पीएमआरडीए’च्या रिंगरोडसंदर्भात मध्यंतरी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. त्यात पुरंदर येथील विमानतळापर्यंत रिंगरोड कसा नेता येईल, याचा विचार करावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या. दरम्यान, एमएसआरडीसीच्या प्रस्तावित रिंगरोड संदर्भात निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारकडून सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली होती. 
या समितीने एमएसआरडीसीच्या रिंगरोडमध्ये बदल सुचविले आहे. हे बदल सुचविताना पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विचार या समितीने करीत ही सूचना एमएसआरडीसील दिली आहेत. या संदर्भातील मार्गांची आखणी करून त्याचा प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना देखील राज्य सरकारने एमएसआरडीसीला दिल्या आहेत.

सोलापूर रस्त्यावरील सोरतापवाडी ते सातारा रस्त्यावरील खेडशिवापूर या दरम्यान एमएसआरडीसीने रिंगरोडची आखणी केली आहे. पीएमआरडीएच्या रिंगरोडला ती ओव्हरलॅप होत आहे. त्यामुळे या समितीने या दरम्यानच्या आखणीत बदल करावा. 

सध्या असलेल्या मार्गाची आखणी दक्षिण- पूर्व म्हणजे सासवडकडे पुनर्रचित करावी. ती करताना पुरंदर येथील विमानतळापर्यंत हा रिंगरोड न्यावा, असे सूचना दिल्या आहेत. राज्य सरकारने दिलेल्या या सूचनांमुळे सोलापूर आणि सातारा रस्त्यावरून पुरंदर येथील विमानतळापर्यंत हा रस्ता जाणार आहे. त्यामुळे विमानतळास जाण्यासाठी सध्या असलेल्या रस्त्यांमध्ये नव्याने या रस्त्याची भर पडणार आहे.

Web Title: pune news ringroad connect to purandar airport