रिंगरोडचे काम रखडले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

सुरक्षेवरून पोलिसांकडून ड्रोनला परवानगी नाही 

पुणे - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) वतीने हाती घेण्यात आलेल्या रिंगरोडच्या कामातील अडथळे अद्याप दूर होत नसल्याचे दिसत आहे. सोलापूर रस्ता ते सातारा रस्तादरम्यान नव्याने रिंगरोड आखणी करताना तो पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडण्यासाठी करण्याचे सर्वेक्षण पोलिस परवानगीत अडकले आहे. वास्तविक मुख्यमंत्र्यांकडेच हे खाते असूनदेखील परवानगी रखडली कशी, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखालील समितीने एमएसआरडीसी रिंगरोडच्या आखणीत नव्याने काही बदल सुचविले होते. त्यानुसार सोलापूर रस्त्यावरील वडकी ते सोरतापवाडी आणि सातारा रस्त्यावरील शिवरेदरम्यान नव्याने रिंगरोडची आखणी करण्यासाठी एमएसआरडीसीने सर्वेक्षणाचे काम हाती घेतले. यात पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळापर्यंत हा रिंगरोड कसा नेता येईल, याचा विचार करावा, अशा सूचनाही सरकारने दिल्या. परंतु या सर्वेक्षणास नागरिकांकडून विरोध होत असल्यामुळे ड्रोनच्या साह्याने सर्वेक्षण करण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला. 

सर्वेक्षण थांबले 
ड्रोन वापरण्यास परवानगी मिळावी, यासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली आहे. सुरक्षिततेच्या कारणावरून ग्रामीण पोलिसांकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे सर्वेक्षणाचे काम थांबले आहे, असे एमएसआरडीसीकडून सांगण्यात आले.

Web Title: pune news ringroad work stop