महापालिकेला खड्ड्यांची यादी

महापालिकेला खड्ड्यांची यादी

पुणे - शहरातील रस्त्यांवर खड्डे पडल्यामुळे काही वाहनचालकांना जीव गमवावा लागला असून काही नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. अनेकांना पाठदुखी आणि मणक्‍याचे विकार होत आहेत. याबाबत शहर वाहतूक शाखेने विभागनिहाय सर्वेक्षण करून खड्डे पडलेल्या रस्त्यांची आणि ठिकाणांची यादी तयार केली असून या रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवावेत, असा प्रस्ताव वाहतूक शाखेच्या वतीने पोलिस उपायुक्‍त अशोक मोराळे यांनी महापालिकेला पाठविला आहे.
 

शहर वाहतूक विभागाने विभागनिहाय नोंदवलेली रस्त्यांची स्थिती
खडक विभागात -
शिवाजी रस्त्यावर शनिवारवाडा ते गोटीराम भैया चौकदरम्यान सांडपाणी वाहिनीची झाकणे खचून खड्डे पडलेले आहेत. 

कोथरूड विभाग -
नळस्टॉपकडे जाताना पौड फाटा पूल पठाणबाबा दर्ग्याजवळ, नळस्टॉप चौक ते पौड फाटादरम्यान बीएसएनएल कार्यालयासमोर खड्डे पडले आहेत.

वारजे परिसर -
शिंदे पूल ते कोंढवे-धावडेपर्यंत, डॉ. आंबेडकर चौक ते कर्वेनगर चौक रस्त्याची दुरवस्था झाली आहे.

दत्तवाडी विभाग -
मित्रमंडळ चौक ते अरण्येश्‍वर चौक, नम्रता इलेक्‍ट्रिकल्सजवळ सेवा रस्ता पुलापर्यंत, ब्रह्मा चौक ते वडगाव पुलापर्यंत, धायरी फाटा चौक ते धायरी शेवटच्या बसथांब्यापर्यंत, उंबऱ्या गणपती चौक ते भूमकर चौक, धायरी लाडली चौक ते नऱ्हे रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत.

कोरेगाव पार्क विभाग -
ब्ल्यू डायमंड चौक ते कोरेगाव पार्क चौक, कोरेगाव पार्क ते लेन क्रमांक एक, एबीसी फार्म चौक ते ताडीगुत्ता चौक रस्ता अपघाती बनला आहे.

विश्रांतवाडी विभाग -
इंद्रायणी नदी ते देहू फाटा या रस्त्यावर खड्डेच खड्डे.

वानवडी विभाग -
रामटेकडी चौक ते फातिमानगर चौकदरम्यान रस्त्यावर, शिवरकर रस्ता, सय्यदनगर चौक ते हंडेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर, वाडकर मळा ते ससाणेनगर चौकाकडे येणारा रस्ता, बी. टी. कवडे रस्ता, घोरपडी गावातून घोरपडी जंक्‍शनकडे येणारा रस्ता खराब झाला आहे.

कोंढवा विभाग -
खडी मशिन चौक ते हंडेवाडी चौकदरम्यान रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यांवर अपघात होत आहेत.

खडकी विभाग -
पोल्ट्री भूमिगत, बोपोडी चौकातील हॅरिस पुलाकडील बाजूचा रस्ता खराब स्थितीत आहे.

चतु:शृंगी विभाग -
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक, सिंफनी सर्कल रेंजहिल्स, ई-स्क्वेअर पुलावरील रस्ता आणि औंधगावात रस्त्यावर खड्डे. 

येरवडा विभाग -
गुंजन चौक, गोल्फ क्‍लब चौक, आंबेडकर चौक, ५०९ चौकातील रस्त्यावर खड्डे पडले आहेत.

हडपसर विभाग -
मुंढवा नदी पुलावर आणि सासवड रस्त्यावर तुकाई दर्शन ते मंतरवाडी फाट्यापर्यंत खड्डे पडलेले आहेत.

भिलारेवाडी रस्त्यावर खड्डेच खड्डे
भारती विद्यापीठ विभागात कात्रज चौक ते भिलारेवाडी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्याचा त्रास वाहनचालकांना होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्यावरील काही खड्डे बुजविण्यात आले; परंतु पुन्हा रस्त्याचे काम रखडले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com