"टिळक यांचा अटकपूर्व जामीन रद्द करावा' 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जुलै 2017

पुणे - कॉंग्रेसचे नेते रोहित टिळक यांना न्यायालयाने दिलेला अंतरिम अटकपूर्व जामीन रद्द करावा, अशी मागणी फिर्यादी महिलेने केली आहे. तिला संरक्षण देण्याची मागणी न्यायालयाने मान्य केली आहे. 

पुणे - कॉंग्रेसचे नेते रोहित टिळक यांना न्यायालयाने दिलेला अंतरिम अटकपूर्व जामीन रद्द करावा, अशी मागणी फिर्यादी महिलेने केली आहे. तिला संरक्षण देण्याची मागणी न्यायालयाने मान्य केली आहे. 

विश्रामबाग पोलिसांनी टिळक यांच्याविरुद्ध बलात्कार आणि अनैसर्गिक कृत्य केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी टिळक यांनी न्यायालयाकडे अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी अर्ज केलेला आहे. या अर्जावरील सुनावणी सुरू असून, तूर्तास न्यायालयाने टिळक यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे. या अर्जावरील पुढील सुनावणी शुक्रवारी झाली. न्यायालयाने टिळक यांना दिलेला अंतरिम अटकपूर्व जामीन रद्द करावा, अशी मागणी फिर्यादीच्या वतीने न्यायालयात केली गेली. पुढील सुनावणी 31 जुलै रोजी होणार आहे. दरम्यान, या घटनेतील फिर्यादी महिलने जीविताला धोका असल्याचा दावा करीत संरक्षण मिळावे, अशी मागणी न्यायालयाकडे केली होती. ती न्यायालयाने मान्य केली. 

शुक्रवारी सुनावणी असल्याने रिपब्लिकन संरक्षण दल या संघटनेने टिळक यांना अटक करण्याची मागणी केली असून, आंदोलनाचा इशारा दिला. न्यायालयाबाहेरील रस्त्यावर या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनेही केली. 

Web Title: pune news rohit tilak