लैंगिक अत्याचारप्रकरणी रोहित टिळकवर गुन्हा दाखल 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

याप्रकरणी एका महिलेने (वय 41) फिर्याद दिली. त्यानुसार लग्नाचे आमिष दाखवून मनाविरुद्ध लैंगिक अत्याचार केला. तसेच, लग्नाची मागणी केल्यानंतर टिळक याने शिवीगाळ व मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पुणे - लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून रोहित दीपक टिळक (वय 38, रा. केसरीवाडा, नारायण पेठ) याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी एका महिलेने (वय 41) फिर्याद दिली. त्यानुसार लग्नाचे आमिष दाखवून मनाविरुद्ध लैंगिक अत्याचार केला. तसेच, लग्नाची मागणी केल्यानंतर टिळक याने शिवीगाळ व मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. रोहित टिळक याने 2014 मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढविली होती. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून भाजप नेते गिरीश बापट यांच्याविरोधात लढलेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. 

रोहित टिळक हा लोकमान्य बाळ गंगाधर टीळकांचा पणतु, तसेच विधान परिषदेचे माजी सभापती जयंतराव टीळकांचा नातू व टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु दिपक टिळक यांचा मुलगा आहे. रोहीतवर भारतीय दंड विधान ३७६, ३७७, ३२३, ५०४, ५०६, ५०७ कलमां अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :

Web Title: Pune news Rohit Tilak filed a case against sexual harassment