'रोझरी'ची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 जून 2017

पुणेः रोझरी ग्लोबल एज्युकेशनच्या शाळांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक परिक्षेच्या दहावीच्या निकालाची 42 वर्षांची 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखली. शाळेचे एकूण 553 विद्यार्थी परिक्षेस बसले होते. यापैकी 353 विद्यार्थी विशेष प्राविण्य वर्गात तर 181 विद्यार्थी प्रथम वर्गात उत्तीर्ण झाले आहेत, अशी माहिती संस्थेचे विवेक अरान्हा यांनी दिली.

कॅम्प शाखेतून निधी कोठारी 97.20 टक्के, वारजे शाखेतून अक्षदा कुदळे 95.20 टक्के, विमान नगर शाखेतून समृद्धी कणकेकर 96.6 टक्के तर साळुंके विहार शाखेतून मुस्तफा चस्माई 93.8 टक्के गुण मिळवून पहिला आला. विमान नगर शाखेतील धीरज गोंचीगर व सुमीत गर्ग यांनी गणित या विषयात पैकीच्या पैकी गुण मिळविले. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

Web Title: pune news rosaray global education ssc result