"आरटीओ'ची आजपासून विशेष वाहन तपासणी मोहीम 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

पुणे - राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांनी (आरटीओ) राज्य रस्ता सुरक्षा मोहिमेंतर्गत गेल्या महिन्यात राबविलेल्या विशेष वाहन तपासणी मोहिमेवर परिवहन आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. तसेच ही मोहीम पुन्हा राबविण्याचे आदेश सर्व आरटीओंना दिले आहेत. त्यानुसार मंगळवार (ता. 19) पासून ही तपासणी मोहीम सुरू होणार आहे. यामध्ये हेल्मेटचीदेखील तपासणी केली जाणार आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने रस्ता सुरक्षा समिती नियुक्त केली आहे. या समितीने दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील सर्व आरटीओंनी गेल्या महिन्यात विशेष वाहन तपासणी मोहीम राबविली होती. त्याचा अहवालदेखील पाठविला होता. मात्र, ही विशेष मोहीम अपेक्षित पद्धतीने राबविण्यात आली नसल्याचे समितीच्या निदर्शनास आले असून समितीने ही बाब परिवहन आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर आयुक्‍तांनी सोमवारपासून सलग चार दिवस पुन्हा ही मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. 

या विशेष मोहिमेत खासगी वाहन व वाहनचालक यांची परवान्याची वैधता, हेल्मेट वापर, सीटबेल्ट, वाहन चालविताना मोबाईलचा वापर, नियमानुसार नंबर प्लेट आहे की नाही, कर्णकर्कश हॉर्न आदी गोष्टींची तपासणी करण्यात येणार आहे. आरटीओचे अधिकारी आणि वाहतूक पोलिस एकत्रित ही कारवाई करणार आहेत. 

परिवहन आयुक्तांच्या आदेशानुसार वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून एकत्रितरीत्या विशेष वाहन तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत शहराबरोबरच राज्य व राष्ट्रीय महामार्गावरदेखील वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे. 
- बाबासाहेब आजरी, प्रादेशिक परिवहन अधिकारी 

Web Title: pune news rto