"आरटीओ'चे नूतनीकरण अन्‌ सर्व सेवा ऑनलाइन करणार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जानेवारी 2018

शिकाऊ परवाना (लर्निंग लायसन्स) काढण्यासाठी येणाऱ्या तरुणांची पहिल्यांदा "आरटीओ'शी ओळख होते आणि ती आयुष्यभर त्यांच्या मनात राहते. ही ओळख चांगली ठरावी, यासाठी प्रयत्नशील आहे. येत्या वर्षभरात आधुनिक आणि सर्व सुविधांनी युक्त आरटीओ कार्यालय उभारणे, सर्व सुविधा ऑनलाइन करणे, आरटीओ सेवा देणारे केंद्र प्रत्येक तालुक्‍यात सुरू करणे, दिवे येथे पासिंग ट्रकची संख्या वाढविणे आणि अंध-अपंगांना सर्व सेवा उपलब्ध करून देण्याचा माझा संकल्प आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी बोलून दाखविला. 

वयाची अठरावर्षे पूर्ण झाली, की "आरटीओ'शी या ना त्या कारणाने प्रत्येकाचा संबंध येतो. पहिल्यांदा आरटीओ कार्यालयात गेल्यानंतर तेथील गर्दी पाहावयास मिळते. हीच ओळख आयुष्यभर कायम राहते. ती पहिली ओळख चांगल्या पद्धतीने व्हावी, यासाठी सर्व सुविधा अधिक चांगल्या प्रकारे देण्यावर भर आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून निधीदेखील मिळाला असून, वर्षभरात शिकाऊ परवाना विभागाचा चेहरा-मोहरा बदलला जाईल. तात्पुरते परमिट असो अथवा अन्य काही सुविधा सध्या पारंपरिक पद्धतीनेच दिल्या जात असून, त्याही ऑनलाइन करणे आणि प्रत्येक तालुक्‍यात किमान एक आरटीओ सुविधा केंद्र उभारणे, दिवे येथे आणखी तीन ते चार ट्रक उभारण्यावर भर दिला जाईल. अंध-अपंगांना कोणाचीही मदत न घेता गेटपासून अधिकाऱ्यांच्या केबिनपर्यंत सहज ये-जा करता यावे, यासाठीच्या सुविधा उभारण्याचा संकल्प असल्याचेही आजरी यांनी सांगितले. 

या बाबी पूर्ण करणार... 
- आरटीओ कार्यालयाचे नूतनीकरण 
- दिवे येथे आणखी नवीन तीन ते चार पासिंग ट्रॅक उभारणे 
- अंध-अपंगांसाठी सुविधा पुरविणे 
- प्रत्येक तालुक्‍यात किमान एक सुविधा केंद्र उभारणे 
- सर्व सुविधा ऑनलाइन करणे

Web Title: pune news RTO online service Babasaheb Azari, Regional Transport Officer