'आरटीओ'चे संकेतस्थळ दुसऱ्या दिवशीही ठप्पच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

पुणे - रिक्षा परवान्यासाठी नव्याने तयार केलेल्या संकेतस्थळाचा घोळ दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिला. त्यामुळे परवान्यासाठी इच्छुक असलेल्यांच्या पदरी बुधवारीही निराशाच पडली.

पुणे - रिक्षा परवान्यासाठी नव्याने तयार केलेल्या संकेतस्थळाचा घोळ दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिला. त्यामुळे परवान्यासाठी इच्छुक असलेल्यांच्या पदरी बुधवारीही निराशाच पडली.

दिल्ली "एनआयसी'ने तयार केलेल्या संकेतस्थळाचे सोमवारी महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. त्यानंतर काही वेळातच हे संकेतस्थळ बंद पडले. दिल्ली येथील एनआयसीच्या इमारतीला आग लागल्याने संकेतस्थळ बंद पडल्याचे आरटीओतील सूत्रांनी सांगितले. दरम्यान, मंगळवारी रात्री हे संकेतस्थळ पुन्हा सुरू झाले. मात्र, अवघ्या काही तासांतच पुन्हा ते बंद पडले. बुधवारी सकाळी पुन्हा सुरू झाले; परंतु त्याची गती अतिशय संथ होती. अर्ज भरताना ओटीपी येत नाही, ऑनलाइन शुल्क भरता येत नाही, अर्ज भरला गेलाच तर त्याची प्रिंट निघत नाही, अशा अनेक अडचणी येत होत्या. रिक्षा फेडरेशनचे खजिनदार बापू भावे म्हणाले, ""संकेतस्थळ सुरळीत होण्याबाबत आरटीओ अधिकाऱ्यांना विचारले असता, गुरुवारी पूर्णपणे सुरू होईल, असे सांगण्यात आले.''

Web Title: pune news rto website close