रेल्वे प्रवाशांनी प्रशासनाला सहकार्य करावे - मोडक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

पुणे - ""रेल्वे प्रवाशांनी आपल्या हक्क व अधिकारांबाबत जागृत राहून न्यायव्यवस्था व रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे,'' असे आवाहन जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एम. मोडक यांनी शुक्रवारी येथे केले. 

पुणे - ""रेल्वे प्रवाशांनी आपल्या हक्क व अधिकारांबाबत जागृत राहून न्यायव्यवस्था व रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे,'' असे आवाहन जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एम. मोडक यांनी शुक्रवारी येथे केले. 

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लोहमार्ग न्यायालय, मध्य रेल्वे प्रशासन, रेल्वे सुरक्षा बल, जिल्हा लोहमार्ग पोलिस यांच्यातर्फे आयोजित रेल्वे प्रवाशांच्या अधिकार व हक्कांबाबत जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते. विभागीय रेल्वे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पी. आर. अष्टुरकर, रेल्वे न्यायालयातील न्यायाधीश संजय सहारे, रेल्वे सुरक्षा बलाचे आयुक्त डी. विकास, रेल्वे पोलिस अधीक्षक डॉ. प्रभाकर बुधवंत, रेल्वे वाणिज्य प्रबंधक एस. के. दास आदी या वेळी उपस्थित होते. 

""लोहमार्ग ओलांडताना रेल्वेच्या प्रवेशद्वाराला बरेच वाहनचालक धडक देतात. त्यामुळे रेल्वेला मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागते. म्हणून वाहनचालकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे,'' असे आवाहन मिलिंद देऊसकर यांनी केले. या प्रसंगी पोलिस निरीक्षक सुनील चाटे, स्टेशन मास्तर ए. के. पाठक; तसेच के. एस. दास, ऍड. व्ही. व्ही. बारभाई, डी. विकास, डॉ. बुधवंत यांनी मार्गदर्शन केले. सहारे यांनी प्रास्ताविक केले. न्यायाधीश स्वप्नील थोडगे यांनी सूत्रसंचालन केले. न्यायालयीन व्यवस्थापक डॉ. अतुल झेंडे यांनी आभार मानले.

Web Title: pune news S M Modak railway passenger