सुप्रिया आणि मी लवकरच एखादं नाटक करू - सचिन 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

पुणे - "" नाटकाची मजा काही औरच, हे मला ठाऊक आहे. नाटक हे अभिनेत्याचं माध्यम म्हटलं जातं. मी खूप आधी नाटक केलंय, पण अलीकडच्या काही वर्षांत चित्रपटांतच गुंतलो. आता मात्र मला पुन्हा नाटक करायचंय. पत्नी सुप्रिया सोबत नाटक करायला आवडेल. आता झाडाच्या अवतीभवती बागडून खूप झालं. आता वेगळं काही करायचं आहे. येत्या काळात आम्ही दोघं एखाद्या नाटकात दिसल्यास आश्‍चर्य वाटू देऊ नका,'' अशा शब्दांत अभिनेते सचिन पिळगावकर यांनी रसिकांना आपल्या आगामी योजनांची सुखद बातमी दिली. 

बालगंधर्व रंगमंदिराच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त बालगंधर्व परिवार आयोजित कार्यक्रमात अभिनेता प्रसाद ओक याने मंगळवारी सचिन यांची मुलाखत घेतली. ते म्हणाले, "" "अपराध मीच केला' या मधुसूदन कालेलकर यांच्या नाटकात मी "बालगंधर्व'मधील प्रयोगात 1972 मध्ये काम केले होते. त्या वेळी मला सुरवातीला सूर सापडत नव्हता. आत्मविश्वास खूप कमी झाला होता; पण माझ्या पहिल्याच प्रवेशाला ज्या टाळ्या मिळाल्या, त्यांनीच माझा आत्मविश्वास मला परत एकदा मिळवून दिला. त्या वेळचा "बालगंधर्व'मधला अनुभव हे माझ्या करिअरमधील महत्त्वाचे योगदान आहे !'' 

या आठवणीसोबतच "मराठी भाषेला डाऊन मार्केट समजू नका', असा वडीलकीचा सल्लाही सचिन यांनी नव्या पिढीला दिला. 

... तर "लक्ष्मीकांत-प्यारेलाल' जोडी कदाचित बनलीच नसती 

सचिन म्हणाले, "" माझ्या सांगीतिक प्रवासात आर. डी. बर्मन यांचं योगदान मोठं आहे. त्यांच्याकडून प्रेरणा घेत मी गाऊ लागलो. पुढे आमच्यात खूप चांगली मैत्रीही झाली. ते मला अनेक गोष्टी सांगत. लक्ष्मीकांत-प्यारेलाल ही जोडी तयार होण्याआधी आरडी बर्मन आणि प्यारेलाल यांची जोडी होणार होती; पण "पारसमणी' चित्रपट आला आणि लक्ष्मीकांत यांच्यासोबत प्यारेलाल यांची जोडी जमली; अन्यथा आज वेगळे चित्र दिसले असते.'' 

Web Title: pune news sachin pilgaonkar