बच्चा हिंदू है ना मुसलमान; बच्चा है मासूम-सा इन्सान ! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

पुणे - 
मैं बच्चों में आकर बच्चा बन जाता हूँ... सीधा साधा सच्चा बन जाता हूँ 
दिनभर फिरता रहता हूँ झोपडों की बस्ती में, रात में घर आकर सच्चा बन जाता हूँ 
बच्चा हिंदू है ना मुसलमान 
बच्चा है मासूम-सा इन्सान 
बच्चा मंदिर में भी जाए, बच्चा मस्जिद में भी जाए 
बच्चे का है धर्म मोहब्बत, बच्चे का ईमान है चाहत... 

पुणे - 
मैं बच्चों में आकर बच्चा बन जाता हूँ... सीधा साधा सच्चा बन जाता हूँ 
दिनभर फिरता रहता हूँ झोपडों की बस्ती में, रात में घर आकर सच्चा बन जाता हूँ 
बच्चा हिंदू है ना मुसलमान 
बच्चा है मासूम-सा इन्सान 
बच्चा मंदिर में भी जाए, बच्चा मस्जिद में भी जाए 
बच्चे का है धर्म मोहब्बत, बच्चे का ईमान है चाहत... 

बालमनाची निरागसता आणि जगाकडे कुठल्याही पूर्वग्रहांनी न पाहण्याची लहान मुलांची दृष्टी उलगडून दाखवणारी आपली ही अर्थपूर्ण कविता मोठ्या ओघवत्या शैलीत उर्दू बालसाहित्यिक नजीर फतेहपुरी यांनी सादर केली आणि विद्यार्थी एकरूपतेने ती ऐकतच राहिले... "नूमवि'च्या विद्यार्थ्यांना हा अनुभव मिळाला तो एका छानशा कार्यक्रमातून. साहित्य अकादमीसारख्या महत्त्वाचा पुरस्कार मिळवणाऱ्या तीन लेखकांना या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भेटता आले, त्यांच्याशी संवादही साधता आला. 

महाराष्ट्र मराठी अध्यापक संघ आणि संवाद, पुणे तर्फे हा कार्यक्रम मंगळवारी झाला. यात यंदा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेले बालसाहित्यिक ल. म. कडू, फतेहपुरी आणि युवा साहित्यिक राहुल कोसंबी यांना गौरविण्यात आले. माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. न. म. जोशी, डॉ. संगीता बर्वे, सुनील महाजन, संजीवनी ओमासे उपस्थित होते. 

या वेळी कडू म्हणाले, ""शिक्षण घेताना एखाद्या तरी कलेची जोपासना करा. छंद विकसित करा. पैसे जगायला मदत करतात आणि "का जगायचं' हे कला शिकवते. आपल्यापाशी काहीही नसलं, तरीही आपण कलावंत होऊ शकतो, हे नेहमी लक्षात ठेवा.'' 

कोसंबी म्हणाले, "" शालेय वयातच मुलांत वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे. का जगावं आणि कसं जगावं, हे त्यातून आपल्याला कळते.'' वाचते व्हा, ऐकते व्हा, लिहिते व्हा, असेही त्यांनी मुलांना सांगितले, तर सबनीस यांनी विद्यार्थ्यांना उद्याचे जबाबदार व चांगले नागरिक बनण्यासाठी मार्गदर्शन केले. 

Web Title: pune news sahitya