थरारक लिंगाण्यावर चिमुकल्याची स्वारी

थरारक लिंगाण्यावर चिमुकल्याची स्वारी

पुणे - दरी-खोऱ्यांतील पायवाट... सुसाट वारा अन्‌ आव्हानात्मक चढाई... अशा आव्हानांना तोंड देत ‘लिंगाणा’ सुळका सर करणारा छोटा गिर्यारोहक म्हणजे साई कवडे. वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी साईने ‘लिंगाणा’ चढण्याची किमया करून दाखवली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत साईने लिंगाणा चढण्याचा पराक्रम केला. गिर्यारोहणासाठीची आव्हाने पेलत साई याने दोन दिवसांत लिंगाण्याची चढाई पूर्ण केली अन्‌ कमी वयात गडकिल्ल्यांच्या भ्रमंतीत रमणाऱ्या या छोट्या गिर्यारोहकाने प्रत्येकालाच थक्क केले. साईने गडकिल्ल्यांच्या भ्रमंतीची शंभरी गाठण्याचा निश्‍चय केला आहे.

वयाच्या चौथ्या वर्षापासून गिर्यारोहण करणाऱ्या साईला वडिलांचे प्रोत्साहन
राज्यातील ७० गडकिल्ले चढण्याचा विक्रम 
शिवरायांचा इतिहास युवापिढीपर्यंत पोचावा आणि गडकिल्ल्यांची साफसफाई राखण्याचा संदेश लोकांपर्यंत पोचावा, या उद्देशाने सुरू केलेला हा प्रवास अविरत सुरू  
शिवनेरीपासून सुरू झालेला प्रवास नुकताच पोचला ‘लिंगाणा’ ट्रेकपर्यंत
भारती विद्यापीठ इंग्लिश स्कूलमध्ये साई हा तिसरीचा विद्यार्थी 

मी स्वतः गिर्यारोहण करतो आणि आतापर्यंत शंभर किल्ले सर केले आहेत. रायगडावरील राज्याभिषेक सोहळ्याला तो माझ्यासोबत आला आणि आपल्या मुलातही गिर्यारोहणाची आवड असल्याचे माझ्या निदर्शनास आले. त्याशिवाय शिवरायांच्या इतिहासाविषयी त्याला माहिती मिळावी, यासाठी लहान वयातच त्याने माझ्यासोबत गडकिल्ले चढायला सुरवात केली. साई प्रत्येक आव्हान सहज पेलतो. लिंगाणाची आव्हानात्मक चढाईही त्याने पूर्ण केली. त्याची आई केतकी, गिर्यारोहक अनिल वाघ आणि श्रमिक गोजमगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने ही किमया केली आहे. तो कराटेही शिकत आहे.
- सुधीर कवडे, साईचे वडील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com