वर्धापनदिनी ‘सकाळ’वर शुभेच्छांचा वर्षाव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जानेवारी 2018

पुणेकरांनी नवीन वर्षाचे जल्लोषमय वातावरणात स्वागत केले. त्यानंतर प्रत्येक पुणेकर उत्स्फूर्तपणे सहभागी होत होता, ते ‘सकाळ’च्या ‘आनंद सोहळ्या’त. ‘सकाळ’ ८७ व्या वर्षात पदार्पण करत असल्यानिमित्ताने हा सोहळा आयोजिण्यात आला होता. त्यामुळे सामान्य वाचकांपासून वेगवेगळ्या क्षेत्रांतील मान्यवरांपर्यंत अनेकांनी या सोहळ्यात सहभागी होऊन ‘सकाळ’ला भरभरून शुभेच्छा दिल्या.

पुणे - वारीत सहभागी व्हावे तसे उत्स्फूर्तपणे असंख्य पुणेकर लोकजीवनाशी एकरूप झालेल्या ‘सकाळ’च्या वर्धापन दिन सोहळ्यात सहभागी झाले होते. कोणी फुलांचा गुच्छ घेऊन, तर कोणी शुभेच्छांचे पत्र घेऊन, कोणी ‘सकाळ’वर केलेले काव्य घेऊन, तर कोणी एकमेकांच्या भेटी घेत आपुलकीची- प्रेमाची भावना व्यक्त करत होते. एकमेकांतील नाते अधिक दृढ करत होते. त्यामुळे हा आनंदसोहळा उत्तरोत्तर रंगत गेला.

पुणेकरांनी नवीन वर्षाचे जल्लोषमय वातावरणात स्वागत केले. त्यानंतर प्रत्येक पुणेकर उत्स्फूर्तपणे सहभागी होत होता, ते ‘सकाळ’च्या ‘आनंद सोहळ्या’त. ‘सकाळ’ ८७ व्या वर्षात पदार्पण करत असल्यानिमित्ताने हा सोहळा आयोजिण्यात आला होता. त्यामुळे सामान्य वाचकांपासून वेगवेगळ्या क्षेत्रांतील मान्यवरांपर्यंत अनेकांनी या सोहळ्यात सहभागी होऊन ‘सकाळ’ला भरभरून शुभेच्छा दिल्या. ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार, संचालिका मृणाल पवार यांनी शुभेच्छा स्वीकारल्या.

केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदामंत्री विजय शिवतारे, खासदार अनिल शिरोळे यांच्यासह राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, साहित्य- संस्कृती, विज्ञान अशा वेगवेगळ्या क्षेत्रांतील वाचक या सोहळ्यात सहभागी झाले होते. यानिमित्ताने नव्या-जुन्या पिढीतील असंख्य वाचक एकत्र आल्याचेच पाहायला मिळाले. कॉफीचा आस्वाद घेत त्यांच्यात वेगवेगळ्या विषयांवर चर्चाही रंगत होती. हे क्षण टिपून ठेवण्यासाठी तरुणाईकडून ‘सेल्फी’ही काढले जात होते, तर काहीजण ‘फेसबुक लाइव्ह’ करीत आपला आनंद व्यक्त करत होते. 

याप्रसंगी ‘सकाळ’चे मुख्य संपादक श्रीराम पवार, संचालक भाऊसाहेब पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप द्विवेदी, मुख्य विपणन अधिकारी कृष्णा मेनन, मुख्य कार्यपालन अधिकारी महेंद्र पिसाळ, संपादक मल्हार अरणकल्ले, कार्यकारी संपादक नंदकुमार सुतार उपस्थित होते.

Web Title: pune news sakal anniversary

टॅग्स