"ऑटो एक्‍स्पो'ला कारप्रेमींचा प्रतिसाद 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

पुणे - एकाच छताखाली विविध नामवंत कंपन्यांच्या कारची माहिती उपलब्ध करून देणाऱ्या "सकाळ ऑटो एक्‍स्पो'ला रविवारी कारप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कारचे फीचर्स आणि मॉडेल कारप्रेमींच्या पसंतीस उतरले आणि त्यांनी कार्सचे बुकिंगही केले. कारमधील अत्याधुनिक फीचर्स आणि सुरक्षेची हमी देणारे मॉडेल्स कारप्रेमींना आवडले. सुटीचा दिवस असल्याने कारप्रेमींना एक्‍स्पोला आवर्जून भेट दिली आणि कारच्या विविध मॉडेल्सची सविस्तर माहिती घेतली. 

"सकाळ माध्यम समूहा'ने कारप्रेमींची आवड लक्षात घेऊन हा एक्‍स्पो आयोजित केला होता. एक्‍स्पोच्या दुसऱ्या दिवशी कारप्रेमींनी गर्दी केली होती. कार घेताना प्रत्येकाच्या मनात खूप प्रश्‍न असतात. त्यांच्या याच प्रश्‍नांची उत्तरे कंपन्यांच्या प्रतिनिधींनी दिले. एक्‍स्पोमध्ये होंडा कार्स, बी. यू. भंडारी फोक्‍सवॅगन, शरयू टोयोटा, विराज स्कोडा, रोहर्ष मोटर्स, नेक्‍सा शिवाजीनगर आणि होंडा कार्स आदी कंपन्यांनी सहभाग घेतला. 

या कंपन्यांनी आपल्या कारच्या फीचर्समध्ये काही नावीन्यपूर्ण बदलही केले आहेत. त्याची सविस्तर माहिती कारप्रेमींना जाणून घेता आली. कारचे बुकिंग करण्यासह सुरक्षा, गुणवत्ता आणि कारच्या लूकविषयीची बोलकी प्रतिक्रियाही कारप्रेमींनी प्रतिनिधींकडे नोंदवली. एकाच ठिकाणी नामवंत कंपन्यांच्या कार्स पाहायला मिळाल्याने अनेकांचे कार घेण्याचे स्वप्न वास्तवात उतरले. त्यामुळे कारप्रेमींसाठी हा एक्‍स्पो खास ठरला. कार घेण्यासह या क्षेत्रात झालेले नावीन्यपूर्ण बदलही त्यांना जाणून घेता आले. 

Web Title: pune news Sakal Auto Expo