स्पर्धेची माहिती जाणकारांकडून मिळवा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जानेवारी 2018

पुणे -  पु. ना. गाडगीळ आणि सन्स पुरस्कृत ‘सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र २०१८’ या स्पर्धेसाठी ऑडिशन्स होणाऱ्या प्रत्येक शहरात स्पर्धक तरुणींना माहिती देण्यासाठी जाणकारांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही स्पर्धा पूर्णपणे निःशुल्क आहे. खाली दिलेल्या पत्त्यांवर स्पर्धेचे प्रवेश अर्ज मिळतील. हे अर्ज त्याच पत्त्यांवर स्वीकारले जातील. 

पुणे -  पु. ना. गाडगीळ आणि सन्स पुरस्कृत ‘सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र २०१८’ या स्पर्धेसाठी ऑडिशन्स होणाऱ्या प्रत्येक शहरात स्पर्धक तरुणींना माहिती देण्यासाठी जाणकारांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही स्पर्धा पूर्णपणे निःशुल्क आहे. खाली दिलेल्या पत्त्यांवर स्पर्धेचे प्रवेश अर्ज मिळतील. हे अर्ज त्याच पत्त्यांवर स्वीकारले जातील. 

स्पर्धेसाठी नाव नोंदणीची अंतिम मुदत (२६ जानेवारी) जसजशी जवळ येत आहे, तसतशी तरुणींची लगबग व उत्साह वाढत आहे. मोठ्या संख्येने नाव नोंदणी करत असलेल्या या तरुणींना स्पर्धेबद्दल अधिक माहिती मिळावी, यासाठी ऑडिशन्स होणाऱ्या प्रत्येक शहरात जाणकारांची नेमणूक करण्यात आली आहे. तरुणींनी खालील दूरध्वनी क्रमांकांवर त्यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ‘सकाळ’ने केले आहे. स्पर्धकांना फॉर्म मिळावेत तसेच ते भरून देता यावेत, यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी इच्छुकांनी खालील दूरध्वनी क्रमांक किंवा पत्त्यावर संपर्क साधावा.

पुणे - ०२० - २५६०२१०० 
 स्पर्धेची तपशीलवार माहिती, तसेच प्रवेश अर्ज व 
नोंदणीसाठी या संकेतस्थळाला भेट द्यावी ः http://www.sakalbeautyofmaharashtra.com/

महिलांसाठी नव्या योजना 
 महिलांना माहिन्यातून एकदा मोफत बस प्रवासाची सुविधा येत्या वर्षात उपलब्ध होणार आहे. त्यासाठी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी एक कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 

महिला मालमत्ताधारकांना सर्वसाधारण करामध्ये प्रोत्साहन म्हणून ५०० रुपये सवलत देण्यात येणार आहे. त्यासाठी ९० लाख रुपयांची तरतूद केली आहे.  

ज्या कंपनीमध्ये संचालक मंडळासह सर्व कर्मचारी महिला असल्यास कंपनीच्या मालमत्ता करामध्ये जास्तीत जास्त अथवा दहा हजार रुपयांपर्यंत त्यांना सवलत मिळणार आहे. त्यासाठी महापालिकेने एक कोटी रुपयांचे अनुदान राखून ठेवले आहे. 

महिला बचत गटांना रोजगारनिर्मितीसाठी ई- मार्केटिंगसाठी संकेतस्थळ सुरू करण्यासाठी २० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

राणी लक्ष्मीबाई महिला सक्षमीकरणाच्या योजनांसाठी सुमारे १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांत हिरकणी कक्ष स्थापन करण्याचेही प्रशासनाने ठरविले असून, त्यासाठी ३० लाख रुपये राखून ठेवले आहेत.

महिलांना मोफत बस प्रवास, मिळकत करात सवलत, सक्षमीकरणासाठी निधी आदी अनेक विषय महिला बालकल्याण समितीने सुचविले होते. त्याची दखल आयुक्तांनी घेतली त्याबद्दल त्यांचे आभार; मात्र या योजना वेगाने मार्गी लागणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रशासनाने तत्परता दाखविली पाहिजे.
- राणी भोसले,  अध्यक्षा, महिला व बालकल्याण समिती

Web Title: pune news Sakal Beauty of Maharashtra 2018