श्रुती मंगेश यांच्या पोशाखाचे कोंदण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

पुणे - सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र’ या स्पर्धेसाठी बनारस टेक्‍सटाइलचा प्रभाव असणारे ड्रेस आम्ही डिझाइन करणार आहोत. घागरा चोली, अनारकली गाऊनचे विस्तृत असे कलेक्‍शन यात असेल. स्पर्धक पूर्ण भारतीय पोशाखात असतील. अंतिम स्पर्धेसाठी गाऊन असतील, असे या स्पर्धेचे डिझाइन आणि कॉश्‍च्युम पार्टनर श्रुती मंगेश यांनी सांगितले. स्पर्धेचे नियम व अटी पाळून केलेल्या पूर्ण भारतीय पोशाखात स्पर्धकांचे आंतरिक सौंदर्य आणि स्त्रीत्व नक्कीच उठून दिसेल, असा आमचा विश्‍वास आहे, असेही त्यांनी नमूद केले. 

ही बहुचर्चित सौंदर्य स्पर्धा पुण्यात होत आहे. बनारस हे सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न आणि पुणे हे सर्वसमावेशक असे कॉस्मॉपॉलिटन शहर. पुणे आणि बनारस यांचा संयोग म्हणजे श्रुती मंगेश.

श्रुती व मंगेश हे दोघेही डिझाइनर. वेस्टर्न आउट फिटस, स्त्रियांचे गाऊन लेहेंगा, पुरुषांसाठी शेरवानी, टस्किडोज असे विविधांगी त्याचे डिझाइनर ड्रेसेस आहेत. मंगेश हा पुण्याचा असून, डिझायनर व सुपर मॉडेलही आहे.

मंगेश हा ग्लॅरग्डाज मॅनहंटमधील अंतिम स्पर्धकही होता. हॉलिवूडमधील अँजलिना जोलीच्या ‘मायटी हर्ट’ या सिनेमासाठी तो एकमेव भारतीय डिझायनर होता. ‘आयएनआयएफडी’चा बेस्ट डिझायनर म्हणूनही त्याची ओळख आहे. श्रुती मूळची बनारसची असून, २०१७ मध्ये तिला टाइम्स पॉवर वूमन म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. या दोन्ही डिझायनरने मराठी फिल्म इंडस्ट्रीसाठी कॉस्च्युम डिझायनर म्हणून काम केले आहे.  

खरेतर सौंदर्य स्पर्धांसाठी डिझाइन करणे आणि फॅशन स्पर्धेसाठी डिझाइन करणे यात फरक असतो. सौंदर्य स्पर्धांचे कपडे डिझाइन करताना अनेक नियम व अटी असतात. त्यानुसार कपडे डिझाइन करावे लागतात, असे श्रुती मंगेश यांनी नमूद केले.

Web Title: pune news sakal beauty of maharashtra competition