‘सकाळ ढोल-ताशा’ स्पर्धेची  अंतिम फेरी गुरुवारी रंगणार

‘सकाळ ढोल-ताशा’ स्पर्धेची  अंतिम फेरी गुरुवारी रंगणार

पुणे - गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवाचे औचित्य साधत ‘सकाळ माध्यम समूहा’ने ढोल-ताशा महासंघाच्या सहकार्याने ढोल-ताशा स्पर्धा आयोजिली आहे. या ‘रांका ज्वेलर्स प्रस्तुत सकाळ ढोल-ताशा स्पर्धा पॉवर्डबाय टायझर’च्या अंतिम फेरीत शहरी वादनाच्या गटात सहा, तर ग्रामीण ढंगाच्या वादनाच्या गटात चार पथकांनी बाजी मारली आहे. स्पर्धेची अंतिम फेरी गुरुवारी (ता. १७) दुपारी चार वाजल्यापासून कर्वेनगर परिसरातील महालक्ष्मी लॉन्स येथे होईल. प्रसिद्ध तालवाद्य वादक नीलेश परब हे सेलिब्रेटी परीक्षक असणार आहेत.

लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड हे या स्पर्धेचे सहयोगी प्रायोजक आहेत. गेल्या आठवड्यात महालक्ष्मी लॉन्स येथे स्पर्धेच्या प्राथमिक फेऱ्या ढोल ताशा (शहरी वादन) व ढोल-ताशा-झांज (ग्रामीण ढंगाचे वादन) अशा दोन गटांत झाल्या होत्या. या स्पर्धांना प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गिरीश सरदेशपांडे, महेश मोळवडे व साहेबराव जाधव यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. सेलिब्रेटी परीक्षक परब यांच्यासह हे तिन्ही परीक्षक स्पर्धेच्या अंतिम फेरीचेही परीक्षण करणार आहेत. 

नीलेश परब ड्रम, ढोल, ताशा, संबळ अशा विविध वाद्यांच्या वादनात तज्ज्ञ आहेत. सारेगमप लिट्‌ल चॅंपस कार्यक्रमात त्यांचे वादन गाजले आहे. अनेक चित्रपटांसाठीही त्यांनी वादन केले आहे. स्पर्धेचे परीक्षण करण्याबरोबरच नीलेश परब हे आपले वादन सादर करणार आहेत. स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या ढोल-ताशा पथकाबरोबरही ते वादन करणार आहेत. 

खालीलप्रमाणे पारितोषिके दिली जाणार
ढोल- ताशा पथक  -प्रथम पारितोषिक - एक लाख रुपये, द्वितीय पारितोषिक - ७५ हजार रुपये, तृतीय पारितोषिक - ५० हजार रुपये.
ढोल- ताशा- झांज पथक - प्रथम पारितोषिक - एक लाख रुपये, द्वितीय पारितोषिक - ७५ हजार रुपये, तृतीय पारितोषिक - ५० हजार रुपये.

अंतिम फेरीतले संघ : ढोल-ताशा (शहरी वादन) 
१. शिवप्रताप वाद्य पथक     २. शिवसाम्राज्य वाद्य पथक
३. शंभूगर्जना ढोल ताशा पथक  ४. शिवाज्ञा ढोल ताशा पथख
५. ऐतिहासिक वाद्य पथक     ६. श्री सुधर्म ढोल-ताशा पथक

ढोल-ताशा झांज पथक (ग्रामीण वादन)
१. हनुमान तरुण मंडळ    २. ओम साई ग्रुप
३. शंभूराजे प्रतिष्ठान    ४. जयनाथ ढोल ताशा पथक

प्रेक्षकांसाठी मोफत प्रवेशिका
अंतिम फेरीच्या स्पर्धा पाहण्यासाठी ढोल-ताशाप्रेमींना प्रवेश मोफत आहे. मात्र, त्यासाठीच्या प्रवेशिका ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर देण्यात येतील. या मोफत प्रवेशिका ‘सकाळ’च्या ५९५ बुधवार पेठ येथील कार्यालयात तसेच व महालक्ष्मी लॉन्स येथे सोमवार (ता.१४) पासून सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत मिळतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com