सकाळ ढोल- ताशा स्पर्धेची आज अंतिम फेरी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

पुणे - गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवाचे औचित्य साधत ‘सकाळ माध्यम समूहा’ने ढोल- ताशा महासंघाच्या सहकार्यातून आयोजित ‘रांका ज्वेलर्स प्रस्तुत सकाळ ढोल- ताशा स्पर्धा पॉवर्डबाय टायझर’च्या प्राथमिक फेऱ्यांनंतर गुरुवारी (ता. १७) अंतिम फेरी रंगणार आहे. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी  लिमिटेड हे या स्पर्धेचे सहयोगी प्रायोजक आहेत. 

पुणे - गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवाचे औचित्य साधत ‘सकाळ माध्यम समूहा’ने ढोल- ताशा महासंघाच्या सहकार्यातून आयोजित ‘रांका ज्वेलर्स प्रस्तुत सकाळ ढोल- ताशा स्पर्धा पॉवर्डबाय टायझर’च्या प्राथमिक फेऱ्यांनंतर गुरुवारी (ता. १७) अंतिम फेरी रंगणार आहे. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी  लिमिटेड हे या स्पर्धेचे सहयोगी प्रायोजक आहेत. 

प्रख्यात तालवादक नीलेश परब यांचे सादरीकरण हे अंतिम फेरीचे आकर्षण आहे. शहरी वादनाच्या गटात सहा, तर ग्रामीण ढंगाच्या वादनाच्या गटात चार पथकांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. प्रत्येक गटातून पहिले तीन विजेते निवडण्यात येतील. कर्वेनगर येथील महालक्ष्मी लॉन्स येथे गुरुवारी दुपारी चार वाजल्यापासून अंतिम फेरीला सुरवात होईल.  

ढोल- ताशा (शहरी वादन) व ढोल- ताशा- झांज (ग्रामीण ढंगाचे वादन) अशा दोन गटांत या स्पर्धा झाल्या. त्यातून एकूण दहा संघांची निवड दोन्ही गटांत मिळून अंतिम फेरीसाठी केली. राजन घाणेकर, गिरीश सरदेशपांडे, महेश मोळवडे व साहेबराव जाधव यांच्यासह स्वतः नीलेश परब हे या अंतिम फेरीचे परीक्षक आहेत. विजेत्या ठरलेल्या ढोल- ताशा पथकाबरोबरही ते वादन करणार आहेत. रोख रकमेच्या पारितोषिकाबरोबरच आकर्षक चषक विजेत्या पथकांना दिला जाणार आहे. 

पारितोषिके  खालीलप्रमाणे
ढोल- ताशा पथक  : प्रथम पारितोषिक : एक लाख रुपये, द्वितीय पारितोषिक : ७५ हजार रुपये, तृतीय पारितोषिक :
५० हजार रुपये.
ढोल- ताशा- झांज पथक : प्रथम पारितोषिक : एक लाख रुपये, द्वितीय पारितोषिक : ७५ हजार रुपये, तृतीय पारितोषिक : ५० हजार रुपये.

अंतिम फेरीतील पथकांचे वादन खालील क्रमाने 
१. शिवप्रताप वाद्य पथक 
२. ऐतिहासिक वाद्य पथक
३. शंभूराजे प्रतिष्ठान (ग्रामीण वादन)
४. श्री सुधर्म ढोल- ताशा पथक
५. शिवाज्ञा ढोल- ताशा पथक
६. हनुमान तरुण मंडळ (ग्रामीण वादन)
७. शंभूगर्जना ढोल- ताशा पथक
८. शिवसाम्राज्य वाद्य पथक
९. ओम साई ग्रुप (ग्रामीण वादन)
१०. जयनाथ ढोल- ताशा पथक (ग्रामीण वादन) 

प्रेक्षकांसाठी सूचना 
अंतिम फेरीसाठी प्रेक्षकांना प्रवेशिका दाखवून मोफत प्रवेश मिळेल. प्रवेशिकांचे वाटप यापूर्वीच केले आहे. प्रेक्षकांसाठीच्या आसन व्यवस्थेत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश दिला जाईल. दुपारी तीन वाजल्यापासून स्पर्धेच्या ठिकाणी प्रवेश दिला जाईल. ही स्पर्धा चांगल्या पद्धतीने पाहता यावी, यासाठी एलईईडी स्क्रीन्सचीही व्यवस्था केली आहे. पावसाळ्याच्या मोसमात ही अंतिम फेरी होत असल्याने प्रेक्षकांनी छत्री वा रेनकोट बरोबर ठेवावा.

Web Title: pune news sakal dhol tasha