सकाळ फर्निचर अँड किचन एक्‍स्पोला उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

पुणे - आपले स्वयंपाकघर सुंदर, स्वच्छ व नीटनेटके असावे, ही प्रत्येक गृहिणीची इच्छा असते. त्यांच्या कल्पकतेला मूर्त रूप देणाऱ्या ‘सकाळ फर्निचर अँड किचन एक्‍स्पो-२०१७’ला गुरुवारी पहिल्याच दिवशी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

पुणे - आपले स्वयंपाकघर सुंदर, स्वच्छ व नीटनेटके असावे, ही प्रत्येक गृहिणीची इच्छा असते. त्यांच्या कल्पकतेला मूर्त रूप देणाऱ्या ‘सकाळ फर्निचर अँड किचन एक्‍स्पो-२०१७’ला गुरुवारी पहिल्याच दिवशी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

स्वारगेट परिसरातील गणेश कला क्रीडा मंच येथे हे प्रदर्शन सुरू असून, झटपट स्वयंपाक बनविणाऱ्या अत्याधुनिक उपकरणांपासून सजावटीसाठी लागणाऱ्या विविध वस्तू या प्रदर्शनात उपलब्ध करण्यात आल्या आहेत. नामवंत ‘किचन अप्लायन्सेस’ ५० हून अधिक उत्पादक कंपन्या यात सहभागी झाल्या आहेत. त्यांनी नवीन व आधुनिक उत्पादने मोठ्या प्रमाणावर उपलब्ध केली असून, येथे मॉड्युलर किचन्सचे वैविध्यपूर्ण प्रकार मिळत आहेत.

एक्‍स्पोला भेट देणाऱ्यांना आकर्षक ऑफर, लाइव्ह डेमोसह सवलती आणि एक्‍स्चेंज ऑफर्स उपलब्ध करण्यात आल्या आहेत. थेट उत्पादक, इंपोर्टर्स आणि होलसेल विक्रेत्यांकडून खरेदी करण्याची ही उत्तम संधी आहे.

नावीन्यपूर्ण वस्तूंची पर्वणी
मॉड्युलर किचन्सचे वैविध्यपूर्ण प्रकार, त्याचबरोबर चिमण्या व हॉब्ज, घरगुती पीठ गिरण्या, फूड प्रोसेसर्स, इलेक्‍ट्रिक तंदूर, इंडक्‍शन व स्टील कुकर्स, वॉटर प्युरिफायर्स, वॉटर हिटर, इन्डोयर ग्रिल मशिन, रोटी मेकर, स्नॅक्‍स मेकर्स, किचन वेअर्स, कटलरी व प्लॅस्टिक नॉव्हेल्टीज, गॅस शेगडीतील व ज्यूस मिक्‍सर ग्राइंडरमधील नावीन्यपूर्ण प्रकारही पाहता येतील. खवय्यांसाठी खास गुजराती नमकीन, इन्स्टंट फूड व लोणची-मसाले, फरसाण, चटपटीत पदार्थांचेही स्टॉल आहेत. स्वयंपाकघरातील नावीन्यपूर्ण प्रकार व विविधता हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे.

सकाळ फर्निचर अँड किचन एक्‍स्पो- २०१७ 
स्थळ - गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेटजवळ
तारीख - सोमवार (ता. ७) ऑगस्टपर्यंत
वेळ - सकाळी ११ ते रात्री ९
प्रवेश विनामूल्य

Web Title: pune news sakal furniture & kitchen expo