डिझायनर फर्निचर घेण्याची संधी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

पुणे - वैविध्यपूर्ण वस्तूंच्या खरेदीची संधी देणाऱ्या ‘सकाळ फर्निचर ॲण्ड किचन एक्‍स्पो’ला शुक्रवारी पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अत्याधुनिक उपकरण ते गृहसजावटीच्या वस्तूंपर्यंत अशा विविध वस्तू एकाच छताखाली लोकांना खरेदी करता आल्या. लाइव्ह डेमोसह एक्‍स्चेंज ऑफर्स आणि विविध सवलतींचा लाभ लोकांना घेता आला. या एक्‍स्पोमध्ये किचन अप्लायन्सेसच्या जोडीला आपले घर सुंदर दिसावे, यासाठी डिझायनर फर्निचरचे विविध प्रकार पाहता येतील. शनिवार आणि रविवार सुटीचे दिवस असल्याने एक्‍स्पोत वस्तूंच्या खरेदीसाठी खास सवलतीही ठेवल्या आहेत. 

एक्‍स्पोत सागवानी लाकूड ते लोखंडापासून तयार केलेले फर्निचर खरेदी करता येईल. फर्निचरमध्ये झोपाळा, डायनिंग सेट्‌स, सोफा कम बेड, बेडरूम सेट, दिवाण सेट, मिनी सीटिंग सेट, सोफा सेट्‌स, वॉडरोब्ज, अँटिक फर्निचर असे विविध प्रकार पाहायला मिळतील. सोफा सेटपासून ते बेडरूम सेटपर्यंतचे प्रकार सागवानी लाकडापासून तयार केले आहेत. फोल्डिंग सोफा विथ बेड, स्प्रिंगपासून तयार केलेले मॅटरेसेस, बीन बॅग्ज, ऑफिस खुर्ची असे विविध प्रकारही खरेदीसाठी आहेत.

एक्‍स्पोचे वैशिष्ट्य म्हणजे किचन अप्लायन्सेससह घराला एक नवे रूप देण्यासाठी डिझायनर फर्निचरचा समावेश केला आहे. फर्निचरसह आकर्षक पडदे, चादरी, कुशन्स, कार्पेट्‌सही आहेत. त्याचबरोबर गृहसजावटीच्या वेगवेगळ्या वस्तूही एक्‍स्पोत असून, विविध नामवंत कंपन्यांनी आपली उत्कृष्ट उत्पादने यात सादर केली आहेत. याशिवाय खवय्यांसाठी खास खाद्यजत्राही भरविली आहे.

प्रदर्शनांची माहिती
कालावधी - सोमवारपर्यंत (ता. ७)
वेळ - सकाळी अकरा ते रात्री नऊ
स्थळ - गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट
प्रवेश विनामूल्य

Web Title: pune news sakal furniture & kitchen expo