ज्येष्ठ नागरिक, महिलांसाठी डोळ्यांच्या स्कॅनिंगची मुभा

ज्येष्ठ नागरिक, महिलांसाठी डोळ्यांच्या स्कॅनिंगची मुभा

तन्मय सुनील देशपांडे - माणिकबाग, सिंहगड रस्ता
प्रश्‍न - पॅन कार्ड अर्जासाठी आधार कार्डवरील वडिलांचे नाव बदलायचे आहे, कसे करू?
उत्तर -
पॅन कार्डमधील नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर यांची दुरुस्ती महा ई सेवा केंद्रांवरील आधार कार्ड केंद्रांवर सशुल्क केली जाईल.

प्रकाश वेलमकर, वारजे माळवाडी.
प्रश्‍न - माझी पत्नी व्हीलचेयरवर आहे. तिच्या आधार कार्डमध्ये नावात बदल करायचा आहे, परंतु, तिला केंद्रावर जाता येत नाही. यावर काय उपाय आहे?
उत्तर -
आधार कार्डाच्या नावात बदल करण्यासाठी प्रत्यक्ष केंद्रावर जाण्याची गरज नाही. आवश्‍यक ती कागदपत्रे जोडून दुरुस्ती करून घेऊ शकता. महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांत किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावर आधार कार्ड केंद्र सेवेसाठी उपलब्ध आहे.

सईदा फरास, हिंजवडी
प्रश्‍न - हाताचे ठसे उमटत नसल्यामुळे आधार कार्ड काढण्यामध्ये अडचणी येत आहेत. तीन ते चार वेळा प्रयत्न करून आधार कार्ड काढता आले नाही?
उत्तर -
आधार कार्ड काढताना वयोवृद्ध, महिला, बालकांच्या हाताचे ठसे उमटत नाही. त्यासाठी केवळ डोळ्यांचे स्कॅनिंग करून आधार कार्ड काढण्याची मुभा देण्यात आली आहे. 

सुरेश आबासाहेब पवार, हुजूरपागा शाळेजवळ, कात्रज
प्रश्‍न - ई-आधार कार्ड काढताना एन्रोलमेंट क्रमांक उलट्या क्रमांकाने दाखवीत असल्यामुळे ई प्रिंट येत नाही, काय करावे?
उत्तर -
तांत्रिक अडचण असण्याची शक्‍यता आहे. तातडीने जवळच्या आधार कार्ड केंद्राशी संपर्क साधावा.

पी. व्ही. देशमुख, सदाशिव पेठ, पुणे
प्रश्‍न - गेल्या सहा महिन्यांपासून आधार कार्ड मिळालेले नाही. 
उत्तर -
आधार कार्डची नोंदणी केल्यानंतर कमीत कमी दोन ते तीन महिने लागतात. काही तांत्रिक अडचणींमुळे उशीर होत असेल. 

विनायक जोशी, कोथरूड 
प्रश्‍न - माझे जुने आधार कार्ड इन-ॲक्‍टिव्ह झाले आहे, मी काय करू?
उत्तर -
पहिल्या टप्प्यामध्ये आधार कार्डला जुना मोबाईल क्रमांक जोडलेला असतो, तो बंद झाला असेल तर इन-ॲक्‍टिव्ह झाल्याचे दाखविले जाते. शहरातून अनेक तक्रारी येत आहेत. आधारच्या अधिकाऱ्यांना याची कल्पना देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com