गोदामाच्या जागेच्या बदल्यात दहा पर्यायी जागा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

पुणे - शिवाजीनगर शासकीय गोदामातील सहा एकर जागेच्या बदल्यात जिल्हा प्रशासनाशी दहा पर्यायी जागांचे करार करण्याचा निर्णय पुणे आणि पिंपरी- चिंचवड महापालिकांनी घेतला आहे. 

पुणे - शिवाजीनगर शासकीय गोदामातील सहा एकर जागेच्या बदल्यात जिल्हा प्रशासनाशी दहा पर्यायी जागांचे करार करण्याचा निर्णय पुणे आणि पिंपरी- चिंचवड महापालिकांनी घेतला आहे. 

जिल्हा प्रशासनाकडून शासकीय गोदामाची 2 हेक्‍टर 66 गुंठ्यांची (26 हजार 684 चौ.मी.) जागा "महामेट्रो'ला हस्तांतरित करण्यात आली. या ठिकाणी पिंपरी ते स्वारगेट, वनाज ते रामवाडी आणि शिवाजीनगर ते हिंजवडी या तीन मार्गांवरील मेट्रोसाठी "इंटरचेंज जंक्‍शन' उभारण्यात येणार आहे. परंतु, या जागेच्या बदल्यात पुणे व पिंपरी महापालिकेकडून पर्यायी जागा आणि आस्थापने देण्यासाठी टाळाटाळ केली जात होती. महामेट्रोकडून गोदामाची जागा लवकर ताब्यात देण्यासाठी मुदत देण्यात येत होती. त्या पार्श्‍वभूमीवर वारंवार पाठपुरावा केल्यानंतर उशिराने जागे झालेल्या पुणे आणि पिंपरी- चिंचवड महापालिकांकडून एकूण दहा जागा देण्याच्या हालचाली सुरू झाल्या. त्यामध्ये पुणे महापालिकेकडून सात, तर पिंपरी- चिंचवड महापालिकेकडून तीन जागांच्या हस्तांतरासाठी करार करण्यास सुरवात झाली आहे. त्यातील दोन जागा पिंपरी महापालिकेने, तर पुणे महापालिकेकडून सर्व सात जागांसाठीचे करार करण्यात येणार आहेत. या संदर्भात "सकाळ'ने वृत्त छापून सातत्याने पाठपुरावा केला होता. 

मेट्रोच्या पर्यायी जागेसाठी भोसरीतील गोदामाची जागा मिळणार आहे, त्याचा करार झाला असून, पुणे स्थानक येथील एसटी महामंडळाच्या इमारतीमधील जागा राज्य शासनाकडून मिळणार आहे. हा करारही अंतिम टप्प्यात आहे. परंतु, सर्व दहा जागा हस्तांतरित झाल्यानंतरच शिवाजीनगर गोदामाची जागा महामेट्रोला देण्यात येईल. 
- राजेंद्र मुठे, निवासी उपजिल्हाधिकारी 

Web Title: pune news sakal news impact