आठ कोटींची औषधे खरेदीचा निर्णय 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

पुणे - महापालिकेची रुग्णालये आणि दवाखान्यांसाठी सुमारे आठ कोटी रुपयांची औषधे खरेदी करण्याचा निर्णय स्थायी समितीने मंगळवारी घेतला. त्यासाठी विविध 14 विक्रेत्यांकडून (डीलर्स) औषधे घेण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. याशिवाय, शहरी गरीब योजनेसाठी औषधे खरेदी करण्याला मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे रुग्णालयांमध्ये आता पुरेसा औषधसाठा उपलब्ध होणार आहे. 

महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये इंजेक्‍शन सीरिंजपासून ते प्रसूतीसाठी लागणाऱ्या अत्यावश्‍यक औषधांचा तुटवडा असून, त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत असल्याचे वृत्त "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर सवलतीच्या दरात देण्यात येणाऱ्या औषधांसह शहरी गरीब आणि अंशदायी वैद्यकीय साह्य योजनेच्या औषध खरेदीच्या प्रक्रियेला वेग आला. महापालिकेची सर्व रुग्णालये आणि दवाखान्यांना लागणाऱ्या औषधांसाठी एकत्रित खरेदीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यासाठी आठ कोटी रुपयांची औषध खरेदी करण्यात येणार असून, या औषधांचा पुरवठा 14 औषध पुरवठादारांकडून होणार आहे. या संदर्भातील ठरावाला मंजुरी दिली असून, त्यामुळे पालिकेच्या रुग्णालयांमध्ये औषधे उपलब्ध होतील. ज्यामुळे रुग्णांचे हाल होणार नाहीत, असे स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. 

मोहोळ म्हणाले, ""महापालिकेच्या रुग्णालयांसाठी औषधे खरेदी करण्याच्या प्रक्रियेच्या अटी-शर्तींमध्ये बदल केला आहे. त्यामुळे औषधे खरेदीची प्रक्रिया लांबली होती. परंतु, रुग्णांना वेळेत औषधे देण्यासाठी याबाबतचा ठराव मंजूर केला आहे. तसेच, शहरी गरीब योजनेतर्गंत खरेदीची प्रक्रिया करण्यात येणार असून, औषधे खरेदीचा आदेश (वर्क ऑर्डर) देण्यात येईल. त्यानंतर वेळेत औषधे उपलब्ध होतील.'' 

दरम्यान, महापालिकेने प्रथमच औषध खरेदी करताना जेनेरिक आणि ब्रॅंडेड असा फरक केला असून, त्यामुळे जेनेरिक औषधांच्या किमतीमध्ये 50 टक्‍क्‍यांपर्यंत, तर ब्रॅंडेड औषधे 22.5 टक्के कमी दराने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Web Title: pune news sakal news impact medicine

टॅग्स