मुदत वाढल्याने ग्राहकांची अलोट गर्दी

मुदत वाढल्याने ग्राहकांची अलोट गर्दी

पुणे - एकाच छताखाली दर्जेदार उत्पादनांच्या खरेदीची संधी देणाऱ्या ‘सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल’ला गुरुवारी पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गुरुवारच्या औद्योगिक सुटीचे निमित्त साधून ग्राहकांनी प्रचंड गर्दीत खरेदीचा आनंद लुटला. लोकाग्रहास्तव या प्रदर्शनाची मुदत रविवारपर्यंत (ता. ३) वाढविण्यात आली आहे.

खरेदी हा तर मुली, महिलांचा आवडीचा भाग. या प्रदर्शनात खास महिला-युवतींसाठी कपडे, दागिने, सौंदर्य प्रसाधने, फूटवेअर असे असंख्य प्रकार बघावयास मिळतील. दागिन्यांमध्ये खड्यांचे, मोत्यांचे, इमिटेशन ज्वेलरी असे अनेक प्रकार आहेत. ज्वेलरीसोबत परफ्युम्स, सौंदर्यप्रसाधने, प्रिंटेड टीशर्टस, फूटवेअर असे अनेक नवनवीन आकर्षक प्रकार उपलब्ध आहेत.

गृहसजावटीमध्ये चादरी, पडदे, पेंटिग्न, म्युरल्स आणि किचन अप्लायन्सेस आहेत. तसेच इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू, लहान मुलांसाठी कपडे, खेळणी, शैक्षणिक पुस्तके आदींचाही समावेश आहे. या प्रदर्शनातील खाद्यजत्रा हा तर आबालवृद्धांचा आवडीचा विषय. या खाद्यजत्रेत विविध पदार्थांचा आस्वाद घेता येईल. नवनवीन उत्पादने, उत्तम दर्जा, माफक किमती ही प्रदर्शनाची वैशिष्ट्ये आहेत.

देशभरातील नामांकित कंपन्यांनी प्रदर्शनात सहभाग घेतला असून, उत्कृष्ट उत्पादने सादर केली आहेत. यंदा प्रदर्शनाचे २० वे वर्ष असल्याने खरेदीवर भरघोस सवलती देण्यात आल्या आहेत. यानिमित्ताने महिला, ज्येष्ठ नागरिक, सैन्यदलातील व्यक्तींसह ‘सकाळ मधुरांगण’, ‘सह्याद्री सुरक्षा कवच’, ‘सकाळ एनआयई’, ‘तनिष्का’ आणि ‘यंग बझ’च्या सभासदांना प्रवेश मोफत आहे.

सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल २०१७
कोठे : ॲग्रिकल्चर कॉलेज ग्राउंड, सिंचननगर, रेंजहिल्स, शिवाजी नगर, पुणे
केव्हा : रविवारपर्यंत (ता. ३)
कधी : सकाळी ११ ते रात्री ९
प्रवेश फी ः १० रु. 
वाहनतळ सुविधा मोफत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com