नोंदणीसाठी रविवारी अखेरची मुदत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

पुणे - ‘सकाळ-सह्याद्री सुरक्षा कवच’ आरोग्य योजनेच्या दहाव्या वर्षाची नावनोंदणी करण्याची मुदत रविवारी (ता. १८) संपत आहे. वयाची ५० वर्षे पूर्ण केलेल्यांना या योजनेत सहभागी होता येईल. नवीन सभासदांना १ ऑगस्टपासून आंतररुग्ण सेवा मिळेल. योजनेचा कालावधी ३१ मार्च २०१८ पर्यंत आहे.

सर्व सभासदांसाठी दीड लाख रुपयांची सवलत आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्या सभासदांनाही शुल्कात ७५ टक्के सवलत मिळेल.

पुणे - ‘सकाळ-सह्याद्री सुरक्षा कवच’ आरोग्य योजनेच्या दहाव्या वर्षाची नावनोंदणी करण्याची मुदत रविवारी (ता. १८) संपत आहे. वयाची ५० वर्षे पूर्ण केलेल्यांना या योजनेत सहभागी होता येईल. नवीन सभासदांना १ ऑगस्टपासून आंतररुग्ण सेवा मिळेल. योजनेचा कालावधी ३१ मार्च २०१८ पर्यंत आहे.

सर्व सभासदांसाठी दीड लाख रुपयांची सवलत आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्या सभासदांनाही शुल्कात ७५ टक्के सवलत मिळेल.

एकदाही आंतररुग्ण सेवा न घेणाऱ्या सभासदांसाठी सवलत मर्यादा एक लाख ८० हजार रुपये आहे. विविध चाचण्या व तपासण्यांच्या शुल्कात व औषधांवर १० ते ४० टक्के सूट मिळेल. सर्व सुविधा ‘सह्याद्री हॉस्पिटल’च्या पुण्यातील सर्व शाखांमध्ये उपलब्ध असतील. रविवारही (ता. १८) सर्व केंद्रांवर नोंदणी सुरू राहील.

नोंदणीची ठिकाणे -
सह्याद्री स्पेशालिटी हॉस्पिटल - डेक्कन जिमखाना, कर्वे रस्ता. सह्याद्री हॉस्पिटल कोथरूड - वनाज कंपनीसमोर, पौड रस्ता; सूर्या हॉस्पिटल - शनिवारवाड्याजवळ, कसबा पेठ. सह्याद्री हॉस्पिटल हडपसर - मगरपट्टा कॉर्नर, पुणे-सोलापूर रस्ता, हडपसर. सह्याद्री हॉस्पिटल बिबवेवाडी - सुहाग मंगल कार्यालयाशेजारी, बिबवेवाडी. सह्याद्री हॉस्पिटल बोपोडी - (कै.) द्रौपदाबाई मुरलीधर खेडेकर दवाखाना, जनरल हॉस्पिटल व ट्रॉमा सेंटर, खडकी कॉर्नर, बोपोडी पोलिस चौकीजवळ. सह्याद्री हॉस्पिटल नगर रस्ता : हर्मिस हेरिटेज फेज २, शास्त्रीनगर, येरवडा. वेळ : सकाळी ९.३० ते सायं. ६.३०

शुल्क भरण्याचा तपशील
वय ५० ते ६९ वर्षे पूर्ण केलेल्या गटासाठी ः ३१०० + ६५० रुपये एकरकमी रोख भरावेत किंवा ‘सह्याद्री हॉस्पिटल्स लि.’ या नावे काढलेल्या ३,१०० रुपयांच्या आणि ‘सकाळ पेपर्स प्रा. लि.’ या नावे काढलेल्या ६५० रुपयांच्या डीडी किंवा धनादेशाद्वारे भरावेत. 

वय ७० वर्षे व त्याहून अधिक, या गटासाठी - ४१५० + ६५० रुपये एकरकमी रोख भरावेत किंवा ‘सह्याद्री हॉस्पिटल्स लि.’ या नावे काढलेल्या ४,१५० रुपयांच्या आणि ‘सकाळ पेपर्स प्रा. लि.’ या नावे काढलेल्या ६५० रुपयांच्या डीडी किंवा धनादेशाद्वारे भरावेत. 

सदस्यत्वाच्या नूतनीकरणासाठी सध्याचे ओळखपत्र आणि नव्याने सदस्यत्व घेण्यासाठी वय व निवासाचा दाखला आवश्‍यक. 
सर्व केंद्रांसाठी अधिक माहितीसाठी संपर्क - ९६७३३३१२८९ किंवा ९६७३३३१२८४ 
संकेतस्थळ - www.sahyadrihospital.com

माझे वडील आजारी असताना त्यांना सह्याद्री सुरक्षा कवच योजनेचा बराच फायदा झाला. तसेच माझे ऑपरेशन झाले तेव्हाही वैद्यकीय खर्चात या योजनेमुळे बराच हातभार लागला.  
- सतीश देशपांडे, लाभार्थी

Web Title: pune news sakal suraksha kavach registration