भ्रमंतीचे शेकडो पर्याय एकाच ठिकाणी

भ्रमंतीचे शेकडो पर्याय एकाच ठिकाणी

पुणे - ऑस्ट्रेलियापासून युरोपपर्यंत... काश्‍मीरपासून कन्याकुमारीपर्यंत... जगभरातील भ्रमंतीच्या शेकडो पर्यायांची माहिती एकाच ठिकाणी देणाऱ्या ‘सकाळ ट्रॅव्हल मार्ट २०१७’ ला शुक्रवारी पर्यटनप्रेमी पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध पर्यटन संस्थांनी दिलेल्या सवलतींसह विविध टूर्स पॅकेजेसची माहिती घेण्यासह अनेकांनी प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी सहलींचे थेट बुकिंगही केले. भ्रमंतीसाठी जगभरातील उत्कृष्ट ठिकाणे, सहकुटुंब फिरण्यासाठी टूर्स पॅकेजेस आणि सुरक्षित प्रवासाची खात्री देणाऱ्या या तीन दिवसांच्या प्रदर्शनात नामांकित ट्रॅव्हल कंपन्यांनी सहभाग घेतला आहे.  

‘सकाळ माध्यम समूहा’ने आयोजिलेल्या या प्रदर्शनाचे उद्‌घाटन पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाले. ‘केसरी टूर्स’च्या संचालिका झेलम चौबळ, ‘एसटीए हॉलिडेज्‌’चे संचालक अजित सांगळे, ‘नीलेश गायकवाड ग्रुप’चे संचालक कॅप्टन नीलेश गायकवाड, ‘ट्रॅव्हल एजंट्‌स असोसिएशन ऑफ पुणे’चे अध्यक्ष डॉ. विश्‍वास केळकर, संचालक नीलेश भंसाली, दीपक पुजारी आणि ‘सकाळ’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक शैलेश पाटील या वेळी उपस्थित होते. 

‘एसटीए हॉलिडेज्‌’ हे प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक, तर ‘कॅप्टन नीलेश अंदमान’ हे सहप्रायोजक आहेत.  

फिरायला जात असताना पर्यटकांच्या मनात घोळणाऱ्या प्रश्‍नांची उत्तरे ट्रॅव्हल मार्टमध्ये मिळणार आहेत. जगभरात पर्यटनाचे अनेक पर्याय आज उपलब्ध आहेत. पर्यटन हा चांगला व्यवसाय बनला आहे. याला सरकारचाही पाठिंबा आहे.
- गिरीश बापट, पालकमंत्री, पुणे

पर्यटकांना सातही खंडांत फिरता यावे यासाठी ‘केसरी टूर्स’ने या प्रदर्शनात पॅकेजेस सादर केली आहेत. या पॅकेजेसवर पर्यटकांना काही सवलतीही मिळणार आहेत.
- झेलम चौबळ, संचालिका, केसरी टूर्स

आम्ही ‘ट्रॅव्हल क्‍लब’ ही नवी संकल्पना पर्यटकांसाठी आणली आहे. क्‍लबच्या सदस्यांसाठी मोफत पर्यटन कार्यशाळा आणि टॉक शो होणार आहेत. इंडोनेशियातील बालीसह अनेक टूर पॅकेजेस पर्यटकांसाठी उपलब्ध केली आहेत.
- अजित सांगळे, संचालक, ‘एसटीए हॉलिडेज्‌’ 

लोकांमध्ये देशभक्ती रुजावी, यासाठी १० वर्षांत सुमारे एक लाख लोकांना अंदमान- निकोबारची सफर घडविण्याचे आमचे नियोजन आहे. आतापर्यंत ५२ हजार लोकांनी अंदमान- निकोबारची सफर केली असून, आपला ऐतिहासिक वारसा यातून लोकांसमोर येत आहे.
 - कॅप्टन नीलेश गायकवाड,  संचालक, नीलेश गायकवाड ग्रुप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com