बजेटमधील टूर पॅकेजेस

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 जुलै 2017

‘सकाळ ट्रॅव्हल मार्ट’ला पर्यटनप्रेमींचा प्रतिसाद

पुणे - भ्रमंतीच्या शेकडो पर्यायांची माहिती पर्यटनप्रेमींना शनिवारी ‘सकाळ ट्रॅव्हल मार्ट २०१७’ मध्ये मिळाली. जगभरातील पर्यटनासाठीचे विविध पर्याय जाणून घेण्यासाठी पर्यटनप्रेमींनी गर्दी केली होती. तसेच, काहींनी थेट बुकिंगही केले. 

‘सकाळ ट्रॅव्हल मार्ट’ला पर्यटनप्रेमींचा प्रतिसाद

पुणे - भ्रमंतीच्या शेकडो पर्यायांची माहिती पर्यटनप्रेमींना शनिवारी ‘सकाळ ट्रॅव्हल मार्ट २०१७’ मध्ये मिळाली. जगभरातील पर्यटनासाठीचे विविध पर्याय जाणून घेण्यासाठी पर्यटनप्रेमींनी गर्दी केली होती. तसेच, काहींनी थेट बुकिंगही केले. 

ऑस्ट्रेलिया, अमेरिका, दक्षिण आफ्रिका, युरोप आदी देशांसह जम्मू-काश्‍मीर, अंदमान-निकोबार, पश्‍चिम बंगाल, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र अशा विविध राज्यांतील पर्यटनाला जाण्यासाठीचे अनेक पर्याय पर्यटनप्रेमींना पाहता आले. नामांकित ट्रॅव्हल कंपन्यांच्या टूर पॅकेजेस्‌ची माहिती त्यांना घेता आली. तसेच, टूर पॅकेजेस्‌मधील जगभरातील उत्कृष्ट भ्रमंतीची ठिकाणे पर्यटनप्रेमींच्या पसंतीस पडली. रविवारी (ता. २३) प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असून, ट्रॅव्हल कंपन्यांनी टूर पॅकेजेस्‌मध्ये खास सवलती ठेवल्या आहेत.
‘सकाळ माध्यम समूहा’ने आयोजिलेल्या या प्रदर्शनाला शनिवारी पर्यटनप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुटीचा दिवस असल्याने ट्रॅव्हल कंपन्यांच्या टूर पॅकेजेस्‌ची माहिती घेण्यासह अनेकांनी पॅकेजेस्‌वर भरघोस सवलतीही मिळवल्या. निसर्गसौंदर्याने नटलेल्या पर्यटनाच्या ठिकाणांसह शैक्षणिक पर्यटन, धार्मिक पर्यटन आणि ऐतिहासिक वारसा स्थळांना भेटी देण्यासाठीचे विविध पर्याय येथे उपलब्ध आहेत.

आठवडाभराची सहल असो वा महिनाभर फिरण्यासाठीचे निमित्त... या प्रदर्शनात सर्व प्रकारच्या टूर पॅकेजेस्‌चा समावेश केला आहे.

ऑस्ट्रेलियापासून ते थायलंडपर्यंत आणि इंडोनेशियापासून ते ब्राझीलपर्यंत विविध देशांत फिरण्यासाठीची बजेटमधील टूर पॅकेजेस्‌ची माहिती येथे मिळेलच. पण, त्याशिवाय देशांतर्गत पर्यटनासाठीचे विविध पर्यायही पसंतीस पडतील. ‘एसटीए हॉलिडेज्‌’ हे प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक, तर ‘कॅप्टन नीलेश अंदमान’ हे सहप्रायोजक आहेत.

‘सकाळ ट्रॅव्हल मार्ट २०१७’
कालावधी - रविवारपर्यंत (ता. २३)
वेळ - सकाळी अकरा ते रात्री आठ
स्थळ - गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट
सुविधा - प्रवेश विनामूल्य

Web Title: pune news sakal travels mart 2017