‘सकाळ ट्रॅव्हल मार्ट’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

पुणे - पर्यटनाचे वेगवेगळे पर्याय एकाच छताखाली उपलब्ध करून देणाऱ्या ‘सकाळ ट्रॅव्हल मार्ट २०१८’ला रविवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. टूर पॅकेजेस्‌ची माहिती घेण्यासाठी शेवटच्या दिवशी मोठी गर्दी झाली होती. सुटीचा दिवस असल्याने पुणेकरांनी प्रदर्शनाला सहकुटुंब भेट देत बुकिंगही केले. सुमारे ५० स्टॉल्समध्ये देशविदेशांतील पर्यटनाच्या पॅकेजेस्‌ची माहिती पर्यटकांना मिळाली.

‘सकाळ माध्यम समूहा’ने आयोजित केलेल्या या प्रदर्शनात बजेटमधील पॅकेजेस उपलब्ध असल्याने अनेकांनी पसंतीही दर्शवली. बजेटमध्ये अनेक पर्याय मिळाल्याने त्यांनी सुटीत सहलीला जाण्याचे नियोजन केले. नामांकित टूर कंपन्यांनी यात सहभाग घेतला होता. कॅप्टन नीलेश गायकवाड हे प्रदर्शनाचे प्रायोजक होते. केसरी टूर्स, गिरिकंद ट्रॅव्हल्स, मास्टर टूर्स, मॅंगो हॉलिडेज, चौधरी यात्रा कंपनी आणि टीजीसीएल हे सहप्रायोजक होते. गुजरात टुरिझम हे स्टेट टुरिझम पार्टनर होते.

पर्यटकांकडून आमच्या कंपनीच्या पॅकेजेस्‌ला चांगला प्रतिसाद मिळाला. तिन्ही दिवशी सुमारे १६ ते १७ लाख रुपयांचे बुकिंग झाले. कैलास मानसरोवरसह देशांतर्गत पर्यटनासाठीच्या पॅकेजेस्‌ला पर्यटकांची पसंती मिळाली. 
- प्रकाश चौधरी, विभागीय व्यवस्थापक, चौधरी यात्रा कंपनी

‘ट्रॅव्हल मार्ट’ प्रदर्शनाला पर्यटकांचा प्रतिसाद चांगला मिळाला. अनेकांनी टूर पॅकेजेस्‌चे थेट बुकिंग केले. आम्ही लेह लडाखचा पर्याय पर्यटकांसाठी उपलब्ध करून दिला होता. पर्यटकांसाठी काहीतरी हटके पर्याय असावेत, यावर आमच्या कंपनीचा भर होता.
- गीतांजली माने, व्यवस्थापक (प्रमोशन), ईशा टूर

‘सकाळ’च्या या प्रदर्शनामुळे पर्यटकांना फिरायला जाण्याचे निमित्त साधता आले. आम्ही देश-विदेशांतील पर्यटनाचे पर्याय त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिले. थायलंड, रशिया, बाली येथील पर्याय पर्यटकांना आवडले.
- गौतम शूर, वरिष्ठ व्यवस्थापक, यात्रा डॉट कॉम

पर्यटकांची संख्या वाढते आहे. कंपन्यांच्या टूर पॅकेजेस्‌च्या साह्याने भ्रमंती करण्याची संख्याही वाढली आहे. आम्हाला प्रदर्शनात चांगला प्रतिसाद मिळाला आणि पर्यटकांनी पॅकेजेसचे बुकिंगही केले.
- अमोलिका वत्तुरकर, व्यवस्थापक, थॉमस कूक इंडिया लिमिटेड

Web Title: pune news sakal travels mart