दीडशेहून अधिक गृहप्रकल्पांचे पर्याय

दीडशेहून अधिक गृहप्रकल्पांचे पर्याय

पुणे - स्वप्नातील घराला मूर्तरूप देणाऱ्या ‘सकाळ वास्तू प्रॉपर्टी एक्‍स्पो’ला गृहखरेदीदारांचा शुक्रवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे ३० हून अधिक नामवंत बांधकाम व्यावसायिकांचे उत्कृष्ट गृहप्रकल्प खरेदीदारांच्या पसंतीस उतरले. हव्या त्या ठिकाणी आणि सोयीसुविधांनी परिपूर्ण असलेल्या गृहप्रकल्पांची चौकशी करण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. परवडणाऱ्या दरात गृहप्रकल्प पाहायला मिळाल्याने काहींनी घरांचे थेट बुकिंगही केले. या एक्‍स्पोत ‘महारेरा’ नोंदणीकृत असलेल्या १६० हून अधिक गृहप्रकल्प पाहायला मिळतील. बावधन असो वा कापूरहोळ...वाघोली असो वा शिक्रापूर आदी ठिकाणचे गृहप्रकल्पांचे पर्याय येथे उपलब्ध आहेत. 

‘सकाळ माध्यम समूहा’ने आयोजिलेल्या या एक्‍स्पोचे उद्‌घाटन ‘स्टेट बॅंक ऑफ इंडिया’चे उपमहाप्रबंधक (बिझनेस आणि ऑपरेशन्स) प्लाबन मोहान्ता यांच्या हस्ते झाले. ‘स्टेट बॅंक ऑफ इंडिया’च्या होम लोन्स विभागाचे सहायक सरव्यवस्थापक गदाधर दास आणि ‘सकाळ’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक शैलेश पाटील या वेळी उपस्थित होते. या एक्‍स्पोत पुण्यातील मध्यवर्ती ठिकाणांसह सिंहगड रस्ता, कात्रज, कोथरूड, कर्वेनगर, औंध, बाणेर, बावधन, कोंढवा अशा विविध ठिकाणचे गृहप्रकल्प पाहता येतील. त्याशिवाय पौड, राजगुरुनगर, पिरंगुट, शिरवळ, फुरसुंगी, सणसवाडी, तळेगाव ढमढेरे, चाकण, लोणीकंद, किरकटवाडी असे पुण्याजवळील ठिकाणचे विविध पर्यायही उपलब्ध आहेत. आयटीतील नोकरदारांना विमाननगर, खराडी, हडपसर, कल्याणीनगर, वडगावशेरी, हिंजवडी येथील गृहप्रकल्पांची माहिती घेता येईल. 

आपल्याला हव्या त्या परिसरात वन बीएचके फ्लॅटपासून ते एखादे कार्यालय घेण्यापर्यंतचे उत्कृष्ट पर्याय येथे आहेत. नवरात्र आणि दिवाळीच्या मुहूर्तावर स्वतःच्या घराचे थेट बुकिंग करता येईल. घरासोबत मिळणाऱ्या सुविधा, सुरक्षेची हमी आणि गुणवत्ता हे या गृहप्रकल्पांचे वैशिष्ट्य आहे. बजेट होम्सपासून ते लक्‍झुरियस घर घेण्याची संधी येथे मिळेल. रिअल इस्टेटशी निगडित होमलोनपासून फायनान्सपर्यंतच्या सर्व प्रश्‍नांबाबतच्या शंकांचे निरसनही येथे होईल. 

गृहखरेदीदारांसाठी एकाच छताखाली ‘सकाळ’ने नामवंत बांधकाम व्यावसायिकांच्या उत्कृष्ट गृहप्रकल्पांची माहिती उपलब्ध करून देण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. मेट्रो सिटी म्हणून नावारूपाला येणाऱ्या पुणे शहरात घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न आहे. ते या एक्‍स्पोतून नक्कीच पूर्ण होईल. बॅंकेकडून खरेदीदारांसाठी होम लोनची सुविधा उपलब्ध करून दिली असून, त्यासाठीच्या अनेक योजनांची माहिती येथे घेता येईल. अधिकाधिक गृहखरेदीदारांनी या एक्‍स्पोला भेट देऊन आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करावे.  
- प्लाबन मोहान्ता, उपमहाप्रबंधक,  बिझनेस आणि ऑपरेशन्स, स्टेट बॅंक ऑफ इंडिया

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com