‘सकाळ वास्तू एक्‍स्पो’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

पुणे - आपल्या हक्काच्या घराला मूर्तरूप देणाऱ्या ‘सकाळ वास्तू एक्‍स्पो’ला रविवारी गृहखरेदीदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे गृहप्रकल्प पाहण्याबरोबरच अनेकांनी घरांचे थेट बुकिंगही केले. 

पुणे आणि परिसरातील गृहप्रकल्पांचे पर्याय खरेदीदारांच्या पसंतीस उतरले. सुटीचा दिवस असल्याने हव्या त्या ठिकाणी आणि सोयीसुविधांनी परिपूर्ण गृहप्रकल्प पाहण्यासाठी खरेदीदारांची गर्दी झाली होती. ‘सकाळ माध्यम समूह’ने आयोजित केलेल्या या एक्‍स्पोचा समारोप रविवारी झाला.

शहरातील मध्यवर्ती ठिकाणांसह सिंहगड रस्ता, बिबवेवाडी, कात्रज, कोथरूड, कर्वेनगर, औंध, बाणेर आणि बावधन आदी ठिकाणच्या गृहप्रकल्पांना खरेदीदारांची पसंती मिळाली. त्याशिवाय राजगुरुनगर, पिरंगुट, पौड, खेड-शिवापूर असे पुण्याजवळील पर्यायही अनेकांना भावले. आयटीतील नोकरदारांनी विमाननगर, वडगावशेरी, खराडी, हडपसर, कल्याणीनगर आणि हिंजवडी येथील प्रकल्पांना पसंती दिली.

वन बीएचके फ्लॅटपासून ते एखादे कार्यालय घेण्यापर्यंतचे उत्कृष्ट पर्याय येथे पाहायला मिळाले. परवडणाऱ्या घरांच्या शृंखलेसह लक्‍झ्युरियस घरांचीही माहिती येथे मिळाली. एकाच छताखाली होमलोनपासून ते फायनान्सपर्यंतच्या सर्व प्रश्‍नांचे येथे निरसन झाले. स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे कर्ज देण्याचे विविध पर्यायही उपलब्ध झाले होते.

Web Title: pune news sakal vastu expo

टॅग्स