'वास्तू एक्‍स्पो'ला गृह खरेदीदारांचा प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 सप्टेंबर 2017

"सकाळ' नेहमीच वेगले उपक्रम पुणेकरांसाठी राबवत आला ही कौतुकास्पद बाब आहे. या एक्‍स्पोतून गृहप्रकल्पांचे उत्कृष्ट पर्याय पाहायला मिळाले. तसेच हव्या त्या ठिकाणी परवडणाऱ्या दरात गृहप्रकल्प पाहता आले. एक्‍स्पोत घर घेण्यासाठी मनात असलेल्या शंकांचे निरसन झाले. गृहप्रकल्प पाहण्यासाठी लोकांनी एक्‍स्पोला नक्की भेट द्यावी.
- प्राची गायकवाड, गृह खरेदीदार

पुणे, : नवरात्र आणि दिवाळीच्या मुहूर्तावर स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या "सकाळ वास्तू प्रॉपर्टी एक्‍स्पो'ला शनिवारी गृह खरेदीदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तीसहून अधिक नामवंत बांधकाम व्यावसायिकांनी सादर केलेले उत्कृष्ट गृहप्रकल्प गृह खरेदीदारांना पाहायला मिळाले. परवडणाऱ्या दरातील गृहप्रकल्पांचे काहींनी थेट बुकिंगही केले. रविवारी (ता. 24) एक्‍स्पोचा समारोपाचा दिवस असून, व्यावसायिकांच्या सोयीसुविधांनी परिपूर्ण असलेले गृहप्रकल्प पाहण्याची संधी उपलब्ध आहे.

"सकाळ माध्यम समूहा'ने आयोजित केलेल्या या प्रदर्शनात शनिवारी "महारेरा' नोंदणीकृत असलेले 160हून अधिक गृहप्रकल्प खरेदीदारांना पाहता आले. एक्‍स्पोत पुण्यातील मध्यवर्ती ठिकाणांसह सिंहगड रस्ता, वाघोली, बावधन, कात्रज, कोथरूड, कर्वेनगर, औंध बाणेर, कोंढवा अशा विविध ठिकाणच्या गृहप्रकल्पांची चौकशी खरेदीदारांना करता आली. तसेच पौड, राजगुरुनगर, कापूरहोळ, शिक्रापूर, फुरसुंगी, सणसवाडी, तळेगाव ढमढेरे, चाकण, लोणीकंद, किरकटवाडी असे पुण्याजवळील गृहप्रकल्पांचे विविध पर्यायही खरेदीदारांच्या पसंतीस उतरले. आयटीतील नोकरदारांना विमाननगर, कल्याणीनगर, हडपसर, खराडी, वडगावशेरी आणि हिंजवडी येथील गृहप्रकल्पांची माहिती घेता आली.

या एक्‍स्पोत गृहप्रकल्पांची मोठी शृंखला पाहायला मिळणार आहे. आपल्याला हव्या त्या परिसरात वन बीएचके फ्लॅटपासून ते एखादे कार्यालय घेण्यापर्यंतचे उत्कृष्ट पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. सोयीसुविधा, सुरक्षेची हमी आणि गुणवत्ता हे या गृहप्रकल्पांचे वैशिष्ट आहे. रियल इस्टेटशी निगडित होमलोनपासून फायनान्सपर्यंतच्या सर्व प्रश्नांबाबतच्या शंकांचे निरसनही येथे होईल.

कालावधी : रविवारपर्यंत (ता. 24)
वेळ : सकाळी अकरा ते रात्री आठ
स्थळ : कृषी महाविद्यालयाचे मैदान, सिंचननगर, रेंजहिल्स
प्रवेश व वाहनतळाची सुविधा मोफत.

Web Title: pune news sakal vastu property expo