‘सकाळ इयर बुक २०१८’ची नोंदणी सुरू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जानेवारी 2018

प्रकाशनपूर्व नोंदणी
४५० पेक्षा अधिक पृष्ठसंख्येचे, रु. ३५० मूल्य असलेले हे संदर्भपुस्तक रु. २६० या प्रकाशनपूर्व सवलतमूल्यात उपलब्ध आहे. amazon.in 
(कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध) किंवा sakalpublications.com  येथे नोंदणी करता येईल. पुस्तक ३० जानेवारीपूर्वी उपलब्ध केले जाईल.

पुणे  - राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा, विज्ञान-तंत्रज्ञान, पर्यावरण आदी क्षेत्रांतील महत्त्वाच्या घडामोडींचा वेध घेत, या घडामोडींविषयी तज्ज्ञांचे अभ्यासपूर्ण विश्‍लेषण देणारे ‘सकाळ प्रकाशना’चे ‘सकाळ इयर बुक २०१८’ लवकरच प्रकाशित होत आहे. स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसह राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये रुची असणारे वाचक, अन्य विद्याशाखांचे विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, संशोधक, पत्रकार, संपादक, राजकीय विश्‍लेषक आणि लोकप्रतिनिधींनाही उपयुक्त ठरणाऱ्या या संदर्भ पुस्तकाची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू झाली आहे.

भारतीय संस्कृती, इतिहास या विभागांचा तसेच वर्षभरातील घडामोडींवरील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रसिद्ध लेखकांच्या विशेष अभ्यासपूर्ण लेखांचा समावेश हे ‘सकाळ इयर बुक २०१८’चे वैशिष्ट्य आहे. संपूर्ण वर्षभरात घडलेल्या विविध घटनांची विशेष सामान्यज्ञानासह दिलेली माहिती तसेच या माहितीला पूरक नकाशे, फ्लो चार्टस, इन्फोग्राफ्स, तक्ते, छायाचित्रे यांच्या मांडणीमुळे या पुस्तकाला महत्त्वाच्या दस्तावेजाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

गेल्या तीन वर्षांपासून या संदर्भ पुस्तकाला विविध क्षेत्रांतील वाचकांचा उत्साहवर्धक प्रतिसाद लाभत आहे.

उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड, मणिपूर, गुजरात आणि हिमाचल प्रदेश राज्यांतील विधानसभा निवडणुका, गोहत्याबंदी, तिहेरी तलाक, पंतप्रधानांचा इस्राईल दौरा, डोकलाम प्रश्‍न, उत्तर कोरियाची अणुचाचणी, सार्क परिषदेचे रद्द होणे, १७ वर्षांखालील फिफा फुटबॉल स्पर्धेचे यशस्वी आयोजन या बरोबरच आगामी काळाची नांदी ठरणारे इस्रोने एकाचवेळी १०४ उपग्रहांचे केलेले प्रक्षेपण, कृत्रीम बुद्धिमत्ता, इलेक्‍ट्रिक कार या संकल्पनांचाही आढावा या संदर्भपुस्तकात घेतला आहे.

सकाळ इयरबुक कोणासाठी ?
 स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी
 सामान्यज्ञान तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये रुची असणारे सर्व वाचक
 कला, वाणिज्य, विज्ञान शाखांचे तसेच पत्रकारिता, राज्यशास्त्र आदी सामाजिक शास्त्रांचे विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, संशोधक
 पत्रकार, संपादक, राजकीय विश्‍लेषक, लोकप्रतिनिधी
सकाळ इयर बुक २०१८ मधील विशेष लेख
 रामचंद्र गुहा - चंपारण्यानं गांधीजींना आणि स्वातंत्र्यलढ्याला काय दिलं?
 शशी थरूर - भारतीय रेल्वे आणि त्यामागील ब्रिटिश वसाहतवादी दृष्टिकोन
 जयराम रमेश - गोहत्याबंदी आणि इंदिरा गांधी
 राजदीप सरदेसाई - बिहारमधील सत्ता समीकरणे आणि बिहारबाबतचे सहा गैरसमज
 योगेंद्र यादव - शेतीवरील पर्यावरणीय, आर्थिक संकटे आणि शेतकरी उद्रेक
 सुनीता नारायण - भारतातील प्रदूषणाची गंभीर समस्या
 माधव गाडगीळ - पश्‍चिम घाट पर्यावरण परिसर तज्ज्ञ गट शिफारसींचा आढावा
 वेंकय्या नायडू - भाजप सरकारची आश्‍वासक वाटचाल
 नितीन गडकरी - भविष्यकालीन ऊर्जेची गरज आणि जैवइंधन
 चंद्रशेखर बावनकुळे - महाराष्ट्राचे ऊर्जा धोरण

Web Title: pune news sakal year book 2018