"पेपर क्विलिंग'द्वारे कलेचे दर्शन 

"पेपर क्विलिंग'द्वारे कलेचे दर्शन 

पुणे - रंगबिरंगी कागदापासून ते पणत्या अन्‌ दिवे तयार करत होते...पेपर क्विलिंग कलाकारीच्या माध्यमातून त्या सर्वजणांनी एक-एक करून सुंदर पणत्या-दिवे तयार केले अन्‌ प्रत्येकाने स्वत- मधील छोट्या कलाकाराला वाट करुन दिली...उत्साह अन्‌ कल्पकतेचा वापर करत प्रत्येक लहान मुलाने "पेपर क्विलिंग'च्या माध्यमातून कलाकारीचे दर्शन घडविले. 

निमित्त होते "सकाळ'च्या "यंग रिपब्लिक ऑफ इंडिया (यंग बझ)' आणि "क्विल्स ऍण्ड कर्ल्स ग्रुप'ने आयोजिलेल्या "पेपर क्विलिंग कार्यशाळे'चे. बालगंधर्व रंगमंदिरात सुरू असलेल्या "पेपर क्विलिंग आर्ट प्रदर्शना'च्या दरम्यान ही कार्यशाळा घेण्यात आली. त्यात लहान मुलांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला. ग्रुपच्या अध्यक्षा राजश्री होनराव यांनी मुलांना पेपर क्‍विलिंगपासून विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. प्रदर्शनाचे उद्‌घाटन लेखक वरुण नार्वेकर यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनात पेपर क्विलिंगपासून तयार केलेल्या 50 प्रकारच्या वस्तू पाहायला मिळतील. होनराव यांच्याबरोबरच ममता पाटील, नेहा बागडे, अर्चना चिरपुटकर, अंजली कुलकर्णी, अनिता कऱ्हाडकर, मीना बेलवलकर आणि वीणा अभ्यंकर यांच्या कलाकृती पाहायला मिळतील. हे प्रदर्शन रविवारपर्यंत (ता.15) सकाळी नऊ ते रात्री आठ या वेळेत बालगंधर्व रंगमंदिरात पाहायला मिळेल. 

प्रदर्शनाचे वैशिष्ट्ये 
पेपर क्‍विलिंगवर चॉकलेट बॉक्‍स, फुलदाण्या, ज्वेलरी बॉक्‍स, चौरंग, गणपतीचा मुखवटा, भेटकार्ड, पणती, रांगोळी, कप-बशी, आकर्षक झुमके, बाहुल्या, नेकलेस, निसर्गचित्र आणि विविध प्रेम्स असा कलाविष्कार पाहता येणार आहे. 

आज, उद्या कार्यशाळा 

शनिवारी (ता.14) आणि रविवारी (ता.15) "सकाळ'च्या "यंग रिपब्लिक ऑफ इंडिया (यंग बझ)'तर्फे "पेपर क्विलिंग कार्यशाळा' आयोजित केली आहे. सकाळी अकरा ते दुपारी एक आणि दुपारी दोन ते चार या वेळेत दोन्ही दिवशी कार्यशाळा होईल. या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी 250 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. अधिक माहितीसाठी 8805009395 या क्रमांकावर संपर्क साधावा. 

पेपर क्विलिंगच्या कलेतून विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, कलाकारी आणि क्रिएटिव्हीला वाट मिळते. कला आणखी बहरण्यास मदत होते. त्यामुळे पेपर क्विलिंग कलेशी मुलांना जोडले पाहिजे आणि त्यांना पेपर क्विलिंगचे प्रशिक्षण आवर्जून द्यावे. 
- वरुण नार्वेकर, लेखक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com