भिडे यांना बाजू मांडण्याचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

पुणे - कोरेगाव भीमा येथील हिंसाचारप्रकरणी न्यायालयात दाखल झालेल्या तक्रार अर्जावर बाजू मांडा, असे आदेश विशेष न्यायालयाने श्री शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांना दिले आहेत. 

पुणे - कोरेगाव भीमा येथील हिंसाचारप्रकरणी न्यायालयात दाखल झालेल्या तक्रार अर्जावर बाजू मांडा, असे आदेश विशेष न्यायालयाने श्री शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांना दिले आहेत. 

या घटनेतील पीडित संजय भालेराव यांनी न्यायालयाकडे अर्ज करीत भिडे आणि इतर ५५ जणांविरुद्ध तक्रार केली होती. त्यांचा या गुन्ह्यात सहभाग आहे, त्यांच्याविरुद्ध पोलिस कारवाई करीत नाही, असे त्यात म्हटले होते. १ जानेवारी रोजी घडलेला हिंसाचार आणि त्यापूर्वी वढू बुद्रुक येथे घडलेली घटना यात भिडे यांचा सहभाग आहे. या कालावधीत त्यांनी कोणाशी संपर्क साधला, त्यांची नार्को ॲनालिसिस, ब्रेन मॅपिंग, लाय डिटेक्‍टर चाचणी करावी, आरोपींच्या मोबाईल फोनवरील संभाषणाचा तपशील घ्यावा, आवाजाचे नमुने तपासावेत, अशा विविध मागण्या त्यांनी अर्जात केल्या होत्या. त्यांच्या वतीने ॲड. नितीन सातपुते यांनी अर्जावर बाजू मांडली होती. या अर्जाची दखल घेत न्यायालयाने भिडे यांना बाजू मांडण्याचे आदेश दिले आहे.

२५ एप्रिल रोजी भिडे यांनी स्वत: किंवा वकिलामार्फत बाजू मांडावी, असे या आदेशात नमूद केले आहे. याबाबत ॲड. सातपुते म्हणाले, ‘‘भिडे यांना न्यायालयाने नोटीस काढली आहे. भालेराव हे या घटनेतील पीडित असल्यामुळे ते तपासासंदर्भात न्यायालयात अर्ज दाखल करू शकतात. त्यानुसार हा अर्ज केला होता.’’

Web Title: pune news sambhaji bhide court