"मिलिंद एकबोटे, भिडे गुरुजी यांच्यावरील गुन्हे मागे घ्या' 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जानेवारी 2018

पुणे - कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचाराला मिलिंद एकबोटे आणि भिडे गुरुजी हे जबाबदार नाहीत. त्यांच्यावर केलेले आरोप खोटे असून दोघांवर दाखल केलेला गुन्हा मागे घ्यावा, अशी मागणी विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी शुक्रवारी केली. 

यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मिलिंद एकबोटे आणि भिडे गुरुजी यांना प्रतिनिधींनी आपला पाठिंबा दर्शविला. एकबोटे आणि भिडे गुरुजी हे निर्दोष असून, त्यांना दोषमुक्त करण्यात यावे, अशी मागणी प्रतिनिधींनी या वेळी केली. याबाबत जिल्हाधिकारी सौरभ राव आणि पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांना निवेदन दिल्याचेही त्यांनी सांगितले. 

याबाबत समस्त हिंदू आघाडीचे सरचिटणीस बाळासाहेब विश्‍वासराव म्हणाले, ""एकबोटे हे अनेक वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपून वेगवेगळ्या समाजासाठी काम करत आहेत. कोरेगाव भीमा येथे घडलेल्या हिंसाचाराला ते जबाबदार नाहीत. ते निर्दोष असून त्यांना दोषमुक्त करावे.'' राजे शिवराय प्रतिष्ठानचे महेश पवळे, अखिल विश्‍व हिंदू महासंघाचे हेमेंद्र जोशी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाचे संतोष गायकवाड आणि परीट समाजाचे दिगंबर साळुंके या वेळी उपस्थित होते.

Web Title: pune news Sambhaji Bhide Guruji milind ekbote koregaon bhima