संबळ, ताशाच्या गजरात "संविधान सन्मान रॅली' 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

पुणे - "संविधान आमच्या हक्काचे', "समता स्थापित करणारे', "अभिव्यक्ती स्वातंत्र्य देणारे' अशा आशयाचे फलक घेतलेले कार्यकर्ते, संबळ आणि ताशा वाजविणाऱ्या कलाकारांच्या समवेत सम्यक साहित्य संमेलनानिमित्त "संविधान सन्मान' रॅली काढण्यात आली. भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर व्हावे, अशी मागणीही याप्रसंगी करण्यात आली. 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन स्टडीज आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने 14 जानेवारीपर्यंत बालगंधर्व रंगमंदिर येथे सम्यक साहित्य संमेलन भरविण्यात येत आहे. तत्पूर्वी शिवाजीनगर येथील "एसएसपीएमएस'च्या मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून शिवाजी रस्त्यावरील भिडे वाड्यापर्यंत ही रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये संमेलनाच्या संयोजन समितीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, सरचिटणीस दीपक म्हस्के, स्वागताध्यक्ष डॉ. विजय खरे, संमेलनाध्यक्ष यशवंत मनोहर, डॉ. के. युनुप, शरणकुमार लिंबाळे आणि गाडगे महाराजांच्या वेशभूषेत संभाजी पालवे, नगरसेविका सुनीता वाडेकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) शहराध्यक्ष महेंद्र कांबळे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

Web Title: pune news samvidhan Honor Rally