थापा, जाहिरातबाजीची भाजपची परंपरा - खासदार राऊत 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

हडपसर - हडपसर विधानसभेच्या आमदाराने अठराशे कोटींची कामे केल्याची थाप मारून त्याची जाहिरात केली. भाजपची परंपराच थापा व जाहिरातबाजीची आहे. थापाड्या भाजपला आता जनतेने घरी बसविण्याची वेळ आली आली आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत शिरूर लोकसभा व हडपसर विधानसभा मतदार संघात भगवा फडकेल. यासाठी मतदारांनी जागृत व्हावे, असे आवाहन खासदार संजय राऊत यांनी केले. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रभाग क्र. 26 महमंदवाडी कौसरबागमधील 18 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन श्री. राऊत यांच्या हस्ते झाले, या वेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेना शहरप्रमुख महादेव बाबर, गटनेते संजय भोसले, उपशहरप्रमुख समीर तुपे, संघटक अमोल हरपळे, नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे, नगरसेविका संगीता ठोसर, प्राची आल्हाट, विभागप्रमुख संजय शिंदे, बाळासाहेब भानगिरे, माजी नगरसेवक तानाजी लोणकर, विजय देशमुख, वैष्णवी घुले, यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

राऊत पुढे म्हणाले, मोदींनी चहा विकल्याचा पुरावा दाखवावा. सतराव्या वर्षी घर सोडले, मग चहा विकायला आले कधी. थापाड्यांचे सरकार आहे. लाटेमध्ये योगेश टिळेकर निवडून आले ती वावटळ होती. 

खासदार आढळराव पाटील म्हणाले, हडपसरमधील वाहतुकीचा प्रश्न गंभीर आहे, घोरपडी रेल्वे उड्डाण पुलाला केंद्राच्या संरक्षण खात्याकडून मंजुरी आणली. सय्यदनगर, मांजरी, लुल्लानगर उड्डाण पूल मंजुरीसाठी पाठपुरावा केला आहे. बकरी हिल येतील पाणीप्रकल्प मार्गी लागेल. भाजपचे हुकूमशाही पद्धतीने काम सुरू आहे. हडपसरच्या आमदाराला आता घरी बसविण्याची वेळ आली आहे. 

या वेळी नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे व प्राची आल्हाट यांनी प्रभागातील विकासकामांची माहिती दिली. जयसिंग भानगिरे यांनी आभार मानले.

Web Title: pune news sanjay raut shiv sena bjp