ससून रुग्णालयाच्या "आरोग्यासाठी' सव्वा कोटी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 जून 2017

पुणे - ससून रुग्णालयाच्या देखभाल दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने एक कोटी 30 लाख रुपयांच्या निधीची तरतूद शुक्रवारी केली. दोन वर्षांनंतर रुग्णालयाच्या डागडुजीला सुरवात होणार आहे. त्यामुळे रुग्णालयात होणारी पावसाच्या पाण्याची गळती, तसेच प्रयोगशाळांमध्ये टिपकणारे पाणी थांबेल, असा विश्‍वास सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. 

देखभाल दुरुस्तीअभावी सुमारे साठ वर्षांच्या ससून रुग्णालयाच्या इमारतीचे आयुष्य वेगाने कमी होत असल्याचे "निदान'ही बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी केले. त्याबाबतचे वृत्त "सकाळ'ने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत पालकमंत्री गिरीश बापट यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात त्यांना रुग्णालयातील देखभाल दुरुस्तीसह अकरा मजली इमारतीचे बांधकाम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्या पार्श्‍वभूमीवर हा निधी मंजूर केला आहे. यामुळे ससून रुग्णालयातील दोन वर्षांपासून थांबलेली डागडुजी सुरू होईल, असा विश्‍वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. 

रुग्णालय ही अत्यावश्‍यक सेवा असल्याने एक कोटी 30 लाख रुपयांचा निधी तातडीने मंजूर करण्यात आला. त्यातून रुग्णालयातील गळती प्रतिबंधक कामे करण्यात येतील. पुढील आठवड्यापासून हा निधी खर्च करण्याची प्रक्रिया सुरू होईल. त्यासाठी निविदा मागविणे, त्यातील ठेकेदारांना कार्यारंभ आदेश देण्यात येतील. ऑगस्टपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे. 
भारतकुमार बाविस्कर, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग 

Web Title: pune news sasoon hospital