अपहरण झालेले बाळ अखेर आईच्या कुशीत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जानेवारी 2018

पुणे - ससून रुग्णालयाच्या पदपथावरून अपहरण करण्यात आलेल्या लहान बाळाचा शोध घेण्यात पोलिसांना अखेर यश आले. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने दोघांना अटक केली आहे. बाळ मिळाल्यानंतर आई-वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

चंदा मनोज ऊर्फ लखन चव्हाण (वय २५) आणि मनोज ऊर्फ लखन दत्तात्रेय चव्हाण (वय ३०, रा. पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी बाळाचे वडील नरेंदर बागडी यांनी फिर्याद दिली होती. ते मूळ राजस्थान येथील असून, ससून रुग्णालयाजवळ मालधक्‍का चौकातील पदपथावर राहात होते. नऊ जानेवारी रोजी पहाटे बाळ नसीब याला घेऊन आरोपी पसार झाले होते.

पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांनी गांभीर्य लक्षात घेत गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त समीर शेख यांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक रघुनाथ जाधव यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपास सुरू केला. दरम्यान, हवालदार प्रमोद मगर यांना हे बाळ कर्जत येथे असल्याची माहिती मिळाली. त्यावरून खंडणीविरोधी पथक कर्जतला पोचले. त्या वेळी तेथील बस स्थानकाच्या परिसरात चंदा आणि मनोज चव्हाण हे दोघे त्या बाळाला घेऊन भीक मागत असल्याचे आढळले.

गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक समीर शेख, वरिष्ठ निरीक्षक रघुनाथ जाधव, सहायक निरीक्षक सुनील गवळी, विठ्ठल शेलार, कर्मचारी मंगेश पवार, धीरज भोर, अविनाश मराठे, रमेश गरुड, शिवाजी घुले,  संतोष मते, भाऊसाहेब कोंढरे, फिरोज बागवान, रणजित अभंगे, एकनाथ कंधारे आदी कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

आईच्या डोळ्यांत आनंदाश्रू
बाळ कुशीत येताच आईच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते. हे दृश्‍य पाहून पोलिस आणि तेथील एसटी कर्मचाऱ्यांचीही मने हेलावून गेली. आम्ही बाळाला खूप शिकवणार, असे आई पोलिसांना सांगत होती.

Web Title: pune news sasoon hospital baby