माजी विद्यार्थ्यांच्या अनुभव लेखनातून साकारणार ‘यशोगाथा’

श्रीकृष्ण नेवसे
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

सासवडला वाघिरे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी मेळाव्यात प्राचार्यांच्या मनोदयास मिळाला प्रतिसाद

सासवड (ता. पुरंदर) : 1972 साली वाघिरे महाविद्यालयाची स्थापना झाली. या 45 वर्षात अनेक माजी विद्यार्थी येथून शिक्षणाची व संस्काराची शिदोरी घेऊन विविध क्षेत्रात नेत्रदीपक कार्य करत असून ते ग्रंथरूपात संकलित व्हावे, या हेतूने ‘यशोगाथा’ या ग्रंथनिर्मितीचा मनोदय आहे. हे लेखन साहित्य पुढील पिढीसाठी दस्तावेज ठरेल., अशी अपेक्षा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी व्यक्त केली. त्यास तिथेच अनेक माजी विद्यार्थ्यांनी होकार देत ग्रंथरुपावर शिक्कामोर्तब केले.

सासवड (ता. पुरंदर) येथील वाघीरे महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा नुकताच झाला. त्यावेळी प्राचार्य डाॅ. घोरपडे बोलत होते. डाॅ. घोरपडे म्हणाले., सर्व माजी विद्यार्थ्यांच्या समाजजीवनातील यशामागे वाघीरे महाविद्यालयाच्या प्रांगणातील जडणघडण कशी महत्वपूर्ण ठरली. पुढे जीवनात यशस्वी कसे झालो. या व तत्सम संदर्भात लेखानसाहित्य निर्माण झाले तर पुढील पिढीसाठी तो एक महत्वाचा दस्तावेज ठरेल. या भावनेतून ‘यशोगाथा’ या ग्रंथनिर्मिती होईल. यावेळी राज्य कृषी परीषदेचे माजी उपाध्यक्ष विजय कोलते, के. जे. शिक्षण संस्थेचे संस्थापक कल्याण जाधव, विद्यापीठातील लेखाधिकारी प्रा. एम. एस. जाधव, प्रा. जगदिश शेवते, संजय काटकर, बंडूकाका जगताप, सागर जगताप, प्रभाकर खेडकर, संतोष जगताप, श्री. प्रदीप जगताप, प्रदीप पोमण, शांताराम पोमण, अनुजा गडगे, प्राजक्ता धुमाळ, इंदिरा पवार, भाग्यश्री न्हालवे आदी मान्यवर माजी विद्यार्थी मेळाव्यास उपस्थित होते. पुणे जिल्हा शिक्षण या संस्थेचे उपसचिव श्री. एल एम पवार हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रा. डॉ. नारायण टाक यांनी मेळाव्याचे संयोजन केले.  

उपसचिव श्री. पवार म्हणाले., महाविद्यालय हे एक असे केंद्र आहे की अनेकांना जीवनाची दिशा मिळाली. ज्याकाळी महाराष्ट्राच्या समाजक्षेत्रात शिक्षण चळवळ सुरु झाली होती, त्याकाळात महाविद्यालयाने पुरंदरच्या विकासात महत्वाचे योगदान दिले. माजी विद्यार्थ्यांचे जीवन हीच एक यशोगाथा आहे. यावेळी मनोगतात एम. एस. जाधव म्हणाले., कमवा शिका योजनेतून शिकताना दिवसाला साठ पैसे मिळत असत. इथल्या मातीत आमचे हात राबले आहेत. त्यातून आम्ही मोठे झालो. सासवड महाविद्यालयासाठी माजी विद्यार्थ्यांच्या योगदानातून एखादी आदर्श इमारत उभी राहावी. कल्याण जाधव म्हणाले., माजी प्राचार्य मोहोड सरांनी केलेल्या संस्काराचे ऋण मान्य करावेच लागतात. त्यातून आज शिक्षण संस्था उभी करु शकलो. प्रा. शेवते म्हणाले., पानवाला ते प्राध्यापक हा प्रवास महाविद्यालयामुळे व अत्रेंच्या भूमीमुळे झाला. विजय कोलते म्हणाले., माजी विद्यार्थ्यांनी विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी व एकमेकांची मदत होण्यासाठी संपर्कात राहीले पाहिजे. यावेळी मेळाव्यात अनेकांनी मनोगत मांडले. प्रास्ताविक डॉ. घोरपडे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. टाक व आभारप्रदर्शन उपप्राचार्य दिलीप कदम यांनी केले. संयोजन डॉ. सतीश बोंगाणे, प्रा. सदाशिव ढगे, प्रा. कैलास मेमाणे, प्रा. सुनील दोरगे, डॉ. किरण रणदिवे, प्रा. शोभा तितर, डॉ. बबन माने, प्रा. ऋषिकेश कुंभार आदींनी केले. 

Web Title: pune news saswad former students write success stories