सासवडच्या व्यापारी पुत्राचा पत्नी व प्रियकराने केला खून

सचिन अरविंद चौधरी
सचिन अरविंद चौधरी

सासवड (पुणे): येथील शहरातील व्यापारी पूत्र सचिन अरविंद चौधरी (वय 26, रा. जुने पोष्ट ऑफीसजवळ, सासवड, ता. पुरंदर) या तरुणाची हत्या त्याची पत्नी अर्चना सचिन चौधरी (वय 20) व तिचा प्रियकर बलवान उर्फ बाळू तानाजी आष्टे (वय 25, मुळ रा. उजळम, जि. बिदर, कर्नाटक, सध्या रा. ससाणेनगर, हडपसर-पुणे) यांनी उमरग्याला संगणमताने गळा आवळून व डोक्यात प्रहार करुन खून केल्याचे उघड झाले. दरम्यान, पोलिसांच्या फक्त ताब्यात असलेल्या अर्चनास काल अटक केली. तर आरोपी आष्टे यास आज (मंगळवार) सकाळी अटक केली.

सासवड न्यायालयात दोघांनाही आज दुपारी हजर केले असता, त्यांना आजपासून ता. 13 पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिले आहेत. याबाबत सासवड पोलिस ठाण्यातून आज अधिकृत माहिती देण्यात आली. त्यामुळे 26 ऑक्टोबरपासून सासवडमधून गायब असलेल्या व नंतर उमरग्यास ता. 28 रोजी मृतदेह सापडलेल्या सचिनच्या खूनाबाबत गुढ वाढले होते. या खून प्रकरणातील तक्रार देणारी फिर्यादी स्वतः सचिनची पत्नी अर्चना स. चौधरी हीच होती. तसेच उमरगा पोलिस ठाण्यातून सासवड पोलिस ठाण्याकडे गुन्हा वर्ग झाल्यानंतर ती गेली आठवडाभर तपासातील पोलिसांना रोज बनावाची नविन माहिती देऊन आरोपींच्या शोधार्थ फिरवित होती. मात्र, अखेर पतीच्या खून कटाची तक्रार करणारी अर्चना चौधरीच यातील आरोपी क्रमांक एक ठरली. तर तिचा प्रियकर बाळू आष्टे दुसरा आरोपी ठरला व गजाआड झाले. याबाबत ता. 31 रोजी दैनिक `सकाळ` ने सचिन चौधरीच्या हत्तेत त्याच्या पत्नीचा हात असण्याची शक्यता वर्तविणारी सर्वप्रथम बातमी दिली होती. ती यानिमित्ताने खरी ठरली.

या घटनेबाबत सविस्तर हकीकत अशीः तीन महिन्यांपूर्वी विवाह झालेले सचिन चौधरी व त्याची पत्नी अर्चना चौधरी हे 26 आक्टोबर रोजी दुपारी साडेचारपासून गायब असल्याची तक्रार सासवड पोलिस ठाण्यात सचिनचे वडील अरविंद चौधरींच्या फिर्यादीवरुन दाखल झाली होती. दरम्यान, सचिनचा मारहाणीच्या अवस्थेतील मृतदेह उमरगा भागत मिळून आला व त्याच्या खिशात सासवडच्या संदर्भाने एक चिठ्ठी सापडली. त्यावरुन सासवड पोलिसांकडे चौकशी केल्यावर सहायक फौजदार बी. एस. भागवत व गायब सचिनचे वडील अरविंद चौधरी हे उमरग्याला जाऊन त्यांनी मृतदेह सासवडला आणला. मात्र, दुसरीकडे त्याची पत्नी अर्चना ही उमरग्यातच आजी-आजोबांकडे मिळून आली. तसेच या खूनाच्या घटनेत तिच तक्रारदार म्हणजे फिर्यादी झाली. मृतदेहावर ता. 29 ला अंत्यसंस्कार केले. तिथेच चौधरी कुटुंबिय व त्याचे सगेसोयरे यांचा सचिन चौधरीच्या संशयास्पद खूनात पत्नीचा हात असावा अशी शंका होती. दरम्यान, उमरगा पोलिसांकडून गुन्हा सासवडला वर्ग झाला. अंत्यसंस्कारास आलेली पत्नी अर्चनाही पोलिसांच्या ताब्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तपासास गती दिली. मात्र, अर्चनाच्या रोज नव्या बतावणीच्या माहितीने पोलिस चक्रावून गेले. या प्रकारात ती नाव सांगेल, त्याला आणून सासवड पोलिस त्यांच्या पध्दतीने तपास करीत राहीले व हाती काहीच लागत नव्हते. अखेर सगळी बनवाबनव पोलिसांच्या लक्षात आली व त्यांनी त्यांच्या पध्दतीने विविध स्थळे व तांत्रिक माहिती दुसऱया बाजूने काढली. त्यात मग पळवाटा संपल्याने अखेर अर्चना चौधरी कबूल झाली. तिने केलेला कट सांगितला. सासवडहून फसवून सचिनला उमरग्याला अर्चनानेच नेले. तिथे आरोपी बाळूस बोलावून तूरीच्या रानात नेऊन अगोदर गळा आवळून तर नंतर बाळूने पाईपने ठोके टाकून मारले व अर्चना आजी - आजोबाच्या घरी व बाळू आपल्या घरी पसार झाला. हे सारे दोघांनी कबूल केल्यावर काही पुरावे पोलिसांनी जमा करीत त्यांना अटक केली.

पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक मुकुंद पालवे, पोलिस हवालदार राजेश पोळ, महेश खरात, वर्षा भोसले व टिमने मेहनत घेतली. पोलिस कोठडी मिळाल्याने अधिक तपास सुरु झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com