'शंभरी'तील सासवड विकास सोसायटीचे मंत्री नाईक यांनी केले कौतुक

श्रीकृष्ण नेवसे
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

माजी आमदार चंदुकाका जगताप अध्यक्ष असलेल्या या विकास सोसायटीने सासवडच्या सहकार क्षेत्रात व शेतकरी वर्गात अलीकडच्या काळात चांगली प्रगती केली.

सासवड : येथील तब्बल 100 वर्षे पूर्ण झालेल्या सासवड नंबर दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या (विकास सोसायटी) सुमारे एक कोटी किंमतीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आज केंद्रीय आरोग्य (आयुष मंत्रालय) मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते व पालकमंत्री गिरीष बापट यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी संस्थेच्या वाटचालीचे व प्रगतीचे मंत्र्यांनी कौतुक केले.  

सासवड (ता. पुरंदर) येथील मार्केट यार्ड भागात या एका विकास सोसायटीने स्वतःची इमारत उभी केली.. हेच मुळी कौतुकास्पद आहे. माजी आमदार चंदुकाका जगताप अध्यक्ष असलेल्या या विकास सोसायटीने सासवडच्या सहकार क्षेत्रात व शेतकरी वर्गात अलीकडच्या काळात चांगली प्रगती केली. त्यातूनच स्वतःची इमारत साकारली. या उद्घाटनाच्या वेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, आमदार भाई जगताप, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप, सासवडचे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, विजय वढणे, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप, जिल्हा बँक मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. संजयकुमार भोसले, सहायक निबंधक महेशकुमार गायकवाड, सुरेश चव्हाण, आत्माराम जगताप, दिपक जगताप व संचालक, डाॅ. प्रविण जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. 
  
सासवडला ही विकास सोसायटी 17 डिसेंबर 1917 रोजी स्थापली. त्यामुळे त्यास यंदा 100 वे वर्षे होत आहे. प्रारंभी स्थापनेला 151 सभासदांव्दारे भाग भांडवल 15,000 रुपये होते. 1983 साली चंदुकाका जगताप यांनी सुत्रे हाती घेतल्यावर भागभांडवल व सभासद वाढले. आता 1,035 सभासद व 28 लाख वसूल भागभांडवल, 443 सभासदांना 1 कोटी 35 लाखांचे कर्जवाटप आहे. तर नफा 3.20 लाख रुपये, राखीव निधी 18.26 लाख व 10 टक्के लाभांश वाटप आहे.., अशी माहिती प्रास्तविकात नंदुकाका जगताप यांनी दिली. त्यावर मंत्री महोदयांनी संस्थेचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जितेंद्र देवकर व अनिल उरवणे यांनी केले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: pune news saswad society centenary chandukaka jagtap shripad naik