सातबारा उताऱ्याला मिळेना ‘आधार’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जानेवारी 2018

पुणे - जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर संबंधित मालकांच्या नावाबरोबरच त्यांचा आधार क्रमांक टाकण्याच्या योजनेपुढे प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. सुरक्षिततेच्या कारणामुळे आधार क्रमांकाऐवजी तो ओळखता येईल असे दुसरे कोणते ‘सिक्‍युरिटी फीचर’ देता येईल का, यादृष्टीने भूमी अभिलेख विभागाने विचार सुरू केला आहे. या संदर्भात लवकरच राष्ट्रीय सूचना केंद्राशी (एनआयसी) चर्चा करून नवीन संगणक प्रणाली तयार करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे, त्यामुळे सातबारा अधिक सुरक्षित होणार आहे.

पॅन कार्ड, बॅंक खाते, मोबाईल क्रमांक, गॅसकनेक्‍शनसाठी आधार क्रमांक जोडणी करणे बंधनकारक केले आहे, त्याच धर्तीवर सातबारा उताऱ्यावर आधार क्रमांक टाकण्याचा विचार पुढे आला होता. मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सातबारा उताऱ्यावर आधार क्रमांक लिंक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार राज्याच्या भूमी अभिलेख विभागाने सातबारा उताऱ्यावर आधार क्रमांक नोंदविण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. 

बनावट सातबारा उतारा अथवा जमिनीमालकांच्या नावाशी साधर्म्य असलेली व्यक्ती उभी करून जमीन खरेदी- विक्रीचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यातून न्यायालयीन वाद अन्‌ दाव्यांची संख्याही वाढत आहे. त्याला आळा बसावा, जमीनमालक तसेच खरेदीदारांची फसवणूक होऊ नये, यासाठी उताऱ्यावर आधार नंबर टाकणे हा त्यामागे उद्देश असल्याचे सांगण्यात येत होते. 

माहिती गुपित राहणार
सातबारा उताऱ्यावर आधार क्रमांक नोंदविण्यासाठी एनआयसीमार्फत संगणक प्रणाली विकसित करण्याचे काम सुरू होते. मात्र, आधारबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. मध्यंतरी आधारच्या माहितीची विक्री होत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे सातबारा उताऱ्यावर थेट क्रमांक देण्याऐवजी आधारची माहिती सुरक्षित राहावी, यासाठी ‘सिक्‍युरिटी कोड’ देता येईल का, या संदर्भात विचार सुरू आहे. त्यामुळे सातबारा उताऱ्यावर आधार क्रमांक देण्याची योजना अडचणीत आली आहे. सातबारावर विशिष्ट प्रकारचा सिक्‍युरिटी कोड देऊन जमिनीची खरेदी-विक्री करताना जागामालक आणि खरेदीदारांची ओळख पटेल आणि त्यांची माहिती गुपित राहील, याचा विचार सुरू असल्याचे भूमी अभिलेख विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: pune news sat bara utara aadhar card