विविध संस्था-संघटनांतर्फे सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जानेवारी 2018

पुणे - क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शहरातील अनेक संस्था-संघटनांनी सावित्रीबाई यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले; तसेच कोरेगाव भीमा घटनेचा तीव्र निषेध केला. रिपब्लिकनच्या (आ) वतीने महेंद्र कांबळे, कोमल गायकवाड यांनी पुष्पहार अर्पण केला. बाळासाहेब जानराव, परशुराम वाडेकर, असीत गांगुर्डे, अशोक शिरोळे, संजय सोनावणे, शैलेंद्र चव्हाण उपस्थित होते.

शहर काँग्रेस कमिटीतर्फे मुकेश धिवार, पप्पू केदारी, गोट्या इंगळे, सचिन सावंत, अक्षय सोनवणे, रोहित गुरव, राहुल मांजरेकर; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे रूपाली चाकणकर, उषा घागरे, विकास धायगुडे, सुनील धुमाळ; राष्ट्रीय समाज पक्षातर्फे श्रद्धा भातंब्रेकर, शीतल चव्हाण, भारती वांजळे, अलका पाटील; तर प्रियदर्शिनी शिक्षण संस्थेतर्फे वर्षाराणी कुंभार, शशिकला कुंभार, महेश कुंभार यांनी अभिवादन केले.

झोपडपट्टी सुरक्षा दलातर्फे भगवान वैराट, काशिनाथ गायकवाड, महंमद शेख, संतोष वेताळ; अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेतर्फे प्राचार्य डॉ. सुनील ठाकरे, प्रा. गणेश कोंढाळकर; विश्‍वकर्मा प्रतिष्ठानतर्फे विष्णू गरुड, दीपक लोंढे, भूषण गरुड, कृष्णाजी राऊत; तर अखिल भारतीय माळी समाज प्रबोधन व शिक्षण संस्थेतर्फे कृष्णकांत कुदळे यांनी अभिवादन केले.

भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक निर्माण कृती समितीतर्फे ॲड. महेश सकट, श्रीराम कांबळे, ॲड. नरेंद्र लडकत; महात्मा फुले मंडळातर्फे महापौर मुक्ता टिळक, मधुकर राऊत, हनुमंत टिळेकर, कैलास काठे, ॲड. दिगंबर आल्हाट; बारा बलुतेदार समाज विकास संघातर्फे शोभा यवतकर, रत्नमाला सूर्यवंशी, उषा पंडित, सुनीता कुंभार, संगीता पवार यांनी अभिवादन केले.

Web Title: pune news saviribai phule